30 C
Mumbai
Monday, September 11, 2023
घरमनोरंजननरकातही जागा मिळणार नाही; उर्फी जावेदवर नेटिझन्स भडकले

नरकातही जागा मिळणार नाही; उर्फी जावेदवर नेटिझन्स भडकले

फॅशन जगतात सध्या एकच नाव प्रत्येकाच्या ओठावर आहे, ते म्हणजे उर्फी जावेद. बिग बॉस ओटीटीमधील उर्फी, उर्फीचा अतरंगी पण तेवढाच बोल्ड लूक अशा अनेक गोष्टींमुळे ती दररोज चर्चेत असते. कधी सेफ्टी पिन्स, कधी ब्लेड तर कधी अगदी गोणपाट वापरुन तिने तिचे बोल्ड आउटफिट तयार केले. अभिनेत्रीच्या फॅशन सेन्सचे जेवढे कौतुक होते, त्याहून जास्त तिच्यावर टीका होते.

अभिनेत्री उर्फी जावेद रोज तिच्या अतरंगी चित्रविचित्र कपड्यांमुळे चर्चेत असते. ट्रोलिंगला न जुमानता उर्फी बऱ्याचवेळा सार्वजनिक ठिकाणी अत्यंत बोल्ड कपडे घातलेली दिसते. एका कार्यक्रमातील तिचा ड्रेस पाहून पुन्हा नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावेळी पुन्हा नेटकरी तिच्यावर भडकले आहेत. एवढेच नाही तर पापाराझींनाही तिचे व्हिडीओ किंवा फोटो न काढण्याची विनंती केली आहे. या कार्यक्रमात उर्फीने जाळीचा ट्रान्सपरंट ड्रेस घातला होता. उर्फी अशा वस्तूंपासून ड्रेस बनवते, त्याची कल्पनासुद्धा कोणीही करू शकत नाही. उर्फीने जाळीचा ट्रान्सपरंट ड्रेस घातल्याने तिला आता ट्रोल केले जात आहे. ‘हिच्या मेंदूचा कोणीतरी उपचार करा’ असे , एकाने तर पापाराझींनी ‘हे सर्व कव्हर करणं सोडले पाहिजे’, असे दुसऱ्या एकाने प्रतिक्रिया दिली आहे. ‘हिला नरकातही जागा मिळणार नाही’, अशीही टीका नेटकऱ्यांनी केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

हे सुद्धा वाचा :

गतवर्षीच्या इंग्लंडमधील हिंसक जातीय संघर्षाला भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भाजप जबाबदार

नितिन गडकरींना फोनवरून धमक्या !

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा; टवाळखोरांच्या गोंधळात पत्रकारांना मारहाण

urfi javed, She will have no place even in hell; netizens furious to urfi javed

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी