बॉलीवूडची मराठमोळी मुलगी श्रद्धा कपूरनं इंडस्ट्रीत स्वतःच्या हिमतीवर नाव कमावलं. श्रद्धा कपूर बॉलीवूड मधल्या आघाडीच्या अभिनेत्रीमध्ये गणली जाते. चेहऱ्यावरील निरागस भाव आणि नम्रतेमुळे श्रद्धाला कमी काळातच जबरदस्त फॅन फॉलोईंग मिळाला. इंस्टाग्रामच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात राहणाऱ्या श्रद्धा कपूरनं इंस्टाग्राम सोडण्याचा सल्ला चाहत्याला दिला. परीक्षेसाठी इंस्टाग्राम सोड असा प्रेमळ सल्ला श्रद्धा कपूरनं तिच्या चाहत्याला कमेंट सेक्शनमध्ये दिला.
सोमवारी श्रद्धानं मेकअपलुकचा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला. योगा संपल्यानंतर चटईवर श्रद्धा एका खांद्यावर पडून होती. त्याच पोझमधला फोटो श्रद्धानं इंस्टाग्रामवर पोस्ट केला. तुम्हांला ब्रुसली सारखा एटीट्यूड चेहऱ्यावर हवा असेल तर योगा करा अशी फोटोखाली केप्शन तिनं लिहिली. फोटो पोस्ट होताच प्रवनजन नावाच्या श्रद्धाच्या फॅननं फोटोवर प्रतिक्रिया लिहिली. सकाळी देवाचं दर्शन घेतल्यानंतर तुझा चेहरा पाहिला. आज परीक्षेतील पेपर फोडून टाकणार अशी पोस्ट प्रवनजनं कमेंट सेक्शनमध्ये लिहिली. श्रद्धानंही प्रवनजनच्या कमेंटला रिप्लाय दिला. “तू इंस्टाग्राम सोडलं तर परीक्षा नक्कीच फोडशील. परीक्षेसाठी तुला शुभेच्छा.” श्रद्धाचा रिप्लाय पाहतात प्रवनजनला गहीवरुन आलं.
हे सुद्धा वाचा
भाजपा नेत्यांच्या कारखान्यांना वाचवण्यासाठी सरकार उदार झाले, अजित पवारांना मुख्यमंत्र्यांचे चेकमेट
वरुन धवन कोणाचे कापतोय केस; व्हिडीओ व्हायरल
नाना पटोलेंनी वाजवली हलगी
श्रद्धा इंस्टाग्रामवर फारशी सक्रिय नसते. श्रद्धासाठी तिच्या फॅननी श्रद्धाक्स फॅन्स, श्रद्धा कपूर क्युटी या नावांनी इंस्टाग्रामवर अकाउंट सुरु केलेत. श्रद्धा आपल्या फॅनच्या सर्व अकाउंटला प्रतिक्रिया देत असते. सोमवारी फोटो पोस्ट केल्यानंतर तुला इंस्टाग्राम अकाउंट असल्याचं लक्षात आहे, असा चिमटा श्रद्धाक्स फॅन्सनं काढला. त्यावर श्रद्धानंही मिश्किल प्रतिक्रिया दिली. तुम्ही सकाळी टोमणे मारू लागलात, असं श्रद्धा म्हणाली. आता तुम्ही व्यायाम केल्याचा फोटो पोस्ट करा, असा प्रेमळ सल्ला श्रद्धानं दुसऱ्या चाहत्याला दिला.