31 C
Mumbai
Tuesday, March 26, 2024
Homeमनोरंजनहा महिला दिन 'त्या' महिलांना समर्पित...; महिला दिनानिमित्त सोनाली कुलकर्णीची खास पोस्ट

हा महिला दिन ‘त्या’ महिलांना समर्पित…; महिला दिनानिमित्त सोनाली कुलकर्णीची खास पोस्ट

‘अप्सरा आली’ या गाण्यातून तिचे मनमोहक सौंदर्य आणि नृत्याविष्काराने अवघ्या महाराष्ट्राला सोनाली कुलकर्णीने वेड लावले. (Sonalee Kulkarni) आज जागतिक महिला दिनानिमित्त मराठमोळी सांज आणि वेशभूषा परिधान करत तिने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनत आहे.

सोनाली सध्या तिच्या आगामी ‘मोगलमर्दिनी ताराराणी’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटात ती मुख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटातून बिकट आणि क्लिष्ट परिस्थितीतही ज्यांनी उत्तम व्यवस्थापनाचे उदाहरण स्थापित केले यासोबत एक मुलगी, सून, पत्नी, माता तसेच राजस्त्री या भूमिकांमध्ये देखील आदर्श प्रस्थापित केले अशा अष्टपैलू स्त्रीचे म्हणजेच छत्रपती ताराराणी यांचे जीवन उलगडले जाणार आहे. आता त्यांच्या पराक्रमाबद्दल भाष्य करणारी आणि त्यांना सलाम करणारी एक पोस्ट सोनालीने महिला दिनानिमित्त केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

या सोशल मीडिया पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की, भारतीय इतिहासातील दमदार पात्रांपैकी एक असलेल्या या स्त्रीला पोर्तुगीजांनी ‘रैन्हा डोस मराठे’ किंवा ‘मराठ्यांची राणी’ असेही संबोधले होते. महाराणी ताराबाई भोसले या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सून, सरसेनापती हंबीररावांच्या शूर कन्या आणि भारतातील सर्वात महान मध्ययुगीन सम्राटांपैकी एक आहेत.
अफाट ताकदीने आणि इच्छाशक्तीच्या जोरावर राज्य वाचवणाऱ्या इतिहासातील मोजक्या महिलांपैकी ताराबाईंच्या अदम्य धाडसाला आणि अदम्य वृत्तीला सलाम करावा लागेल.

पुढे ती म्हणते की, मराठ्यांचा उदय-अस्त पाहणारी स्त्री. आपल्या राज्याप्रती अत्यंत समर्पित असलेल्या अदम्य योद्धा महाराणी ताराबाईंनी मराठा महासंघाला अगदी खालच्या पातळीवर असताना विघटित होण्यापासून रोखले नाही तर राष्ट्रीय सत्तेपर्यंत पोहोचण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. या एकट्यानं जगातील सर्वात पराक्रमी शासक औरंगजेबाच्या प्रचंड सैन्याविरुद्ध मराठ्यांचा प्रतिकार केला. मी हा #जागतिकमहिलादिन त्यांना आणि त्यांच्या सारख्या स्त्रियांना समर्पित करते ज्या केवळ स्वतःसाठीच नाही तर आपल्या माणसांसाठी लढतात, अशा भावना सोनालीने व्यक्त केल्या आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत सोनाली कुलकर्णीचे नाव नेहमीच आघाडीवर आहे. ती नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. त्याचप्रमाणे ती सोशल मीडियावर देखील सक्रीय आहे. ती तिच्या आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या घडामोडी चाहत्यांशी कायम शेअर करत असते आणि आज जागतिक महिला दिनानिमित्त तिने भारतातील दमदार स्त्रियांबद्दल तीचे मत व्यक्त केले.

हे सुद्धा वाचा :

महिला दिन विशेष : स्त्रिया ‘बोलत्या’ व्हायला लागल्या तेव्हा…

सोनालीच्या ‘डेटभेट’साठी प्रेक्षक झालेत आतुर !

सोशल मीडियावर जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींसाठी सरकारच्या गाईडलाईन्स

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी