32 C
Mumbai
Friday, September 2, 2022
घरमनोरंजनSonali Phogat : भाजपच्या टिकटॉक स्टार नेत्या सोनाली फोगट यांचा मृत्यू

Sonali Phogat : भाजपच्या टिकटॉक स्टार नेत्या सोनाली फोगट यांचा मृत्यू

आपल्या अदांनी अनेकांना घायाळ करणाऱ्या, टिकटॉक स्टार असलेल्या भाजपच्या नेत्या सोनाली फोगट यांचा गोव्यात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या मृत्यूमुळे कलाविश्वात आणि राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आपल्या अदांनी अनेकांना घायाळ करणाऱ्या, टिकटॉक स्टार असलेल्या भाजपच्या नेत्या सोनाली फोगट (Sonali Phogat) यांचा गोव्यात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या मृत्यूमुळे कलाविश्वात आणि राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सोनाली फोगट या त्यांच्या टिकटॉक व्हिडीओमुळे प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. परंतु त्या राजकरणात देखील सक्रिय होत्या. सोनाली फोगट यांना गोव्यात हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. सोनाली फोगट यांच्या अचानक एक्झिट घेण्याने त्यांच्या चाहत्यांकडून आणि राजकीय नेत्यांकडून तसेच कलाकारांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली देण्यात येत आहे. सोनाली फोगट या कायमच वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे चर्चेत राहिलेल्या होत्या. काहीवेळा तर त्यांना त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे माफी देखील मागावी लागली होती.

सोनाली फोगट या टिकटॉक वर आपले व्हिडीओ पोस्ट करायच्या ज्यामुळे त्या अधिक प्रसिद्ध झाल्या. सोनाली फोगट यांनी त्यांच्या करिअरची हिसार मधील दूरदर्शनमध्ये अँकरिंग करण्यापासून केली. त्यानंतर लगेच त्यांनी २००८ मध्ये भारतीय जनता पक्षात अधिकृतरीत्या प्रवेश केला. तेव्हापासून ते आजतागायत त्या भाजपमध्ये सक्रिय होत्या. २०१९ मध्ये सोनाली फोगट यांनी भाजपच्या तिकिटावर आदमपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांच्यासमोर काँग्रेसचे नेते कुलदीप बिश्नोई उभे होते. परंतु त्या निवडणुकीत सोनाली फोगट यांना पराजित व्हावे लागले. त्यांच्या पराभवानंतर त्यांना भाजपच्या हरियाणा युनिटकडून भाजपच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली.

हे सुद्धा वाचा

Dahi Handi 2022 : मुंबईतील गोविंदाच्या मृत्यूनंतर सरकारने दहिहंडीबाबत घेतलेल्या निर्णयांवर प्रश्न

Shivsena Vs Shidesena : शिवसेनेचा खरा वारसदार आज ठरणार? कोर्टाच्या सुनावणीसाठी उत्सुकता वाढली

ST Bus : संतप्त प्रकार, महामार्गावर अंधारात लाईटविना धावली एसटी बस

सोनाली फोगट या टिकटॉवर व्हिडीओ तर बनवत होत्याच परंतु त्या सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय होत्या. सोनाली फोगट यांनी छोट्या पडद्यावरील मालिका, पंजाबी आणि हरियाणवी म्युजिक व्हिडिओमध्ये सुद्धा काम केले आहे. २०२० मध्ये बिग बॉस हिंदीच्या १४ व्या पर्वात देखील त्या सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्या गायक राहुल वैद्य, अभिनेता अली गोनी यांच्यासोबत अधिक वेळ घालवताना दिसून आल्या. या पर्वात त्यांचे नाव अली गोनी सोबत जोडले गेले. त्यामुळे सुद्धा मोठा वाद निर्माण झाला होता.

सोनाली फोगट या त्यांच्या वादामुळे देखील तितक्याच लोकांना परिचित होत्या. काल (ता. २२ ऑगस्ट) रात्री सोनाली फोगट यांनी इंस्टाग्रामवर एका रिलची पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये त्या एकदम सुंदर दिसत होत्या. गोव्यामध्ये त्या त्यांच्या टीमसोबत गेल्या होत्या. पण अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांनी जगाचा निरोप घेतला.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी