30 C
Mumbai
Friday, September 2, 2022
घरमनोरंजनSonali Phogat Death : सोनाली फोगट यांच्या मृत्यूबाबत खळबळजनक माहिती आली समोर

Sonali Phogat Death : सोनाली फोगट यांच्या मृत्यूबाबत खळबळजनक माहिती आली समोर

सोनाली फोगट हिचा पीए आणि आणखी एका सहकाऱ्यांकडून तिची हत्या करण्यात आली असल्याची माहिती रिंकू ढाका याने गोवा पोलिसांना दिली. रिंकू ढाका याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांकडून सोनाली फोगट हिचा पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर वासी या दोघांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

मंगळवारी २३ ऑगस्ट रोजी भाजपच्या नेत्या असलेल्या सोनाली फोगट (Sonali Phogat) यांचा गोव्यात मृत्यू झाला. सोनाली फोगट यांचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. परंतु सोनाली फोगट यांचा भाऊ रिंकू ढाका याने गोवा पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार सोनाली फोगट हिची हत्या करण्यात आल्याचे त्याने पोलिसात सांगितले आहे. सोनाली फोगट हिचा पीए आणि आणखी एका सहकाऱ्यांकडून तिची हत्या करण्यात आली असल्याची माहिती रिंकू ढाका याने गोवा पोलिसांना दिली. रिंकू ढाका याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांकडून सोनाली फोगट हिचा पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर वासी या दोघांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

सोनाली फोगट यांचा भाऊ रिंकू ढाका याने गोवा पोलिसात केलेल्या तक्रारीनंतर सोनाली फोगट यांच्या मृत्यूबाबत एकच खळबळ उडाली आहे. पण आज गोवा पोलीस महासंचालक ओमवीर सिंह बिश्नोई यांच्याकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये त्यांनी सोनाली फोगट हिच्या मृत्यूबाबत काही महत्वाचे खुलासे केले आहेत. गोवा पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असून यामध्ये सोनाली फोगट हिला तिचा पीए सुधीर सांगवान आणि सहकारी सुखविंदर वासी यांच्याकडून जबरदस्ती अंमली पदार्थ देण्यात आले असल्याची कबुली सुखविंदर वासी यांच्याकडून देण्यात आली आहे.

सोनाली फोगट हिला या दोघांनी जबरदस्ती अमली पदार्थ दिल्यांनतर ते तिला घेऊन टॉयलेटमध्ये घेऊन गेले. ते दोघेही तिथे सोनाली फोगट सोबत दोन तास थांबले. पण तिथे नेमकं काय झालं ? हे अद्यापही कळू शकलेले नाही, परंतु याबाबतची चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती गोवा पोलिसांकडून देण्यात आली आहे. परंतु या प्रकरणाची पोलिसांकडून अधिक चौकशी करण्यात येत असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

सोनाली फोगट हिने मृत्यू होण्याच्या आधल्या रात्री आई आणि बहीण या दोघींना कॉल केला होता. यावेळी सोनालीने तिच्या पीए आणि सहकाऱ्याची तक्रार केली होती. यावेळी ती घाबरली असल्याचे देखील सोनाली फोगट हिच्या भावाकडून सांगण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी सोनाली फोगट हिचा पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर वासी या दोघांना अटक केली.

हे सुद्धा वाचा

Sonali Phogat : भाजपच्या टिकटॉक स्टार नेत्या सोनाली फोगट यांचा मृत्यू

Sonali Phogat Death : भाजपच्या नेत्या सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसात गुन्हा दाखल

Breaking : राष्ट्रवादी नेते अनिल देशमुख रुग्णालयात दाखल, ‘चक्कर’चे झाले निमित्त

सोनाली फोगट हिने 2019 मध्ये भाजपच्या तिकिटावरून हिसार विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तसेच हिंदी बिग बॉसच्या 14 व्या पर्वात देखील सोनाली फोगट सहभागी झाली होती. यावेळी देखील तिच्यापेक्षा वयाने कमी असलेल्या अली गोनी सोबत तिचे नाव जोडले गेल्याने ती वादात सापडली होती. याव्यतिरिक्त सोनाली फोगट ही अनेक वेळा वेगवेगळ्या मुद्द्यांवरून वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी