29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
HomeमनोरंजनMahesh Babu Father Passed Away : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतले अभिनेता महेश बाबूच्या प्रिय...

Mahesh Babu Father Passed Away : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतले अभिनेता महेश बाबूच्या प्रिय व्यक्तीचे निधन

दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूचे वडील कृष्णा घट्टामनेनी यांचे मंगळवारी (ता. 15 नोव्हेंबर) सकाळी निधन झाले. महेश बाबूच्या वडीलांना सोमवारी हृदयविकाराचा झटका आला होता.

दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूचे वडील कृष्णा घट्टामनेनी यांचे मंगळवारी (ता. 15 नोव्हेंबर) सकाळी निधन झाले. महेश बाबूच्या वडीलांना सोमवारी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना हैदराबादमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी संध्याकाळपर्यंत त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. परंतु सकाळी 4 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच्या मृत्यू झाला. महेश बाबूचे वडील आणि सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते कृष्णा यांनी वयाच्या 80 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

तेलुगु सिनेसृष्टीतील सुपरस्टार होते कृष्णा
महेश बाबूचे वडील साऊथचे सुपरस्टार होते. ते तेलुगू चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक होते. महेश बाबूच्या वडिलांचे नाव कृष्णा घट्टामनेनी होते. त्यांना इंडस्ट्रीत सुपरस्टार कृष्णा म्हणून ओळखले जात होते. ते अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक तसेच राजकारणी होते. सुपरस्टार कृष्णा यांनी आपल्या 5 दशकांच्या कारकिर्दीत जवळपास 350 चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांना पद्मविभूषणनेही गौरविण्यात आले. सुपरस्टार कृष्णा यांनी 1961 मध्ये छोट्या भूमिका करत आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती. 1965 मध्ये त्यांनी ‘थे मनसुलु’ या त्यांच्या पहिल्या चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून काम केले. त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर अनेक लोकांची मने जिंकली.

2 महिन्यांपूर्वीच झाले होते महेश बाबूच्या आईचे निधन
2 महिन्यांपूर्वीच महेश बाबूची आई इंदिरा देवी यांचं निधन झालं होतं. इंदिरा देवी या कृष्णा यांच्या पहिल्या पत्नी होत्या. कृष्णा यांची दुसरी पत्नी विजया निर्मला यांनी 2019 मध्ये जगाचा निरोप घेतला. तेव्हापासून कृष्णा हे इंडस्ट्रीपासून दूर आहेत. कोणत्याच कार्यक्रमांमध्ये त्यांनी हजेरी लावली नाही. याच वर्षी जानेवारी महिन्यात कृष्णा यांचा मोठा मुलगा रमेश बाबू यांनी आपले प्राण गमावले. दीर्घ आजारानंतर 8 जानेवारी रोजी त्यांचं निधन झालं.

हे सुद्धा वाचा

PHOTO : अभिनेत्री ते बिझनेस वुमन… असा आहे जुही चावलाचा प्रवास

Rakul Preet Singh : अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने आयएएस अधिकारी अभिषेक सिंगच्या ‘नो शेम मूव्हमेंट’ला दिला पाठिंबा

Deepika Padukoneone : दीपिका पदुकोणने तिचा सेल्फ केअर ब्रँड ’82 ईस्ट’ केला लाँच

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून शोक व्यक्त
कृष्णा घट्टमेननी यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य सिनेसृष्टीमधून अनेकांकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली. अभिनेता निखिल सिद्धार्थने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहिले की, “हे हार्ट ब्रेकिंग आहे. आमचे सुपरस्टार कृष्णा गरु आता राहिले नाहीत. लेजेंड आयकॉन आणि पिढ्यांसाठी प्रेरणा …. आम्ही सर्वजण तुम्हाला मिस करू. @ManjulaOfficial, @urstrulyMahesh सर या कसोटीच्या काळात देव तुमच्या पाठीशी असू दे.

कृष्णा घट्टामनेनी यांच्या निधनाने दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे. तसेच तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहेत. त्यांचे चाहते ट्विटरवर #RIPLegend हा हॅशटॅग वापरून प्रसिद्ध तेलगू अभिनेता कृष्णा यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी