31 C
Mumbai
Wednesday, November 30, 2022
घरमनोरंजनStar Plus New Serial : स्टार प्लसच्या 'फालतू' मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या...

Star Plus New Serial : स्टार प्लसच्या ‘फालतू’ मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या निहारिका चोक्सीने बीसीसीआयच्या निर्णयाचे केले स्वागत

स्टार प्लसची बहुप्रतिक्षित मालिका 'फालतू' प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे. अशातच, प्रेक्षक एका नको असलेल्या मुलीची कथा पाहण्यासाठी आतुरतेने या मालिकेची वाट पाहत आहेत.

स्टार प्लसची बहुप्रतिक्षित मालिका ‘फालतू’ प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे. अशातच, प्रेक्षक एका नको असलेल्या मुलीची कथा पाहण्यासाठी आतुरतेने या मालिकेची वाट पाहत आहेत. या मालिकेत फालतू नावाची भूमिका साकारणाऱ्या तरुणीची आयुष्यातील अडथळ्यांपेक्षा महत्वाकांक्षा मोठी आहे आणि ही मुलगी तिची स्वप्ने साकार करण्यासाठी अतूट प्रयत्न करते. ‘फालतू’ या ही तरुणी क्रिकेटर बनण्याचे स्वप्न पाहते. आयुष्यात येणाऱ्या सर्व अडचणींसह, स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तिच्या स्वप्नांचा पाठलाग करते. जेव्हापासून निर्मात्यांनी त्यांच्या आगामी मालिका ‘फालतू’ प्रदर्शित होण्याची घोषणा केली आहे, तेव्हापासून पेक्षक या कथेकडे आकर्षित झाले असून, ही मालिका प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत.

अलीकडेच, बीसीसीआय (BCCI) सचिव जय शाह यांनी समान वेतनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. तसेच घोषणा केली की, भारतीय महिला क्रिकेटपटूंना आता आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पुरुष क्रिकेटपटूंइतकीच मॅच फी मिळेल. हे पाऊल महिलांच्या क्रिकेट संदर्भात केवळ बदल घडवून आणणार नाही तर युवा महिला क्रिकेटपटूंना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याची संधी देईल.

हे सुद्धा वाचा

Mumbai-Mandwa Water Taxi : मुंबई ते मांडवा वॉटर टॅक्सी 1 नोव्हेंबरपासून धावणार

Producer Kamal Kishore : पत्नीला कारने धडक दिल्याच्या प्रकरणात निर्माते कमल किशोर यांना अटक; आज न्यायालयात होणार सुनावणी

Mumbai-Pune Express Way Accident : मुंबई पुणे महामार्गावर भिषण अपघात! धावत्या ट्रकने घेतला पेट

‘फालतू’ मध्ये एका क्रिकेटरची महत्वाची भूमिका साकारणाऱ्या निहारिका चोक्सी म्हणाल्या की, ‘भारतातील महिला क्रिकेटसाठी हा ऐतिहासिक निर्णय आहे. हे एक पाऊल केवळ भेदभावालाच सामोरे जाणार नाही तर लाखो मुलींसाठी मोठे दरवाजे उघडतील. ज्यांना मोठी स्वप्ने पाहायला आवडतात. मी आता आत्मविश्वासाने सांगू शकते की आम्ही भारतातील महिला क्रिकेटर्ससाठी एका नव्या युगाची सुरुवात करत आहोत. ‘फालतू’ ही एका मुलीची कथा आहे. जी कठीण परिस्थितीतही मोठी स्वप्ने पाहते. भारतातील काही मुलींप्रमाणेच तिलाही क्रिकेटर होण्याची इच्छा आहे. येथे तिला तिच्या गुरूंचा पाठिंबा मिळतो. ज्याची भूमिका आकाश आहुजा साकारणार आहे आणि ही एक मनोरंजक आणि सशक्त कथा आहे.’

स्टार प्लस अशा विविध समस्या मांडण्यात अग्रेसर असून, नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरील मालिका प्रेक्षकांसाठी प्रदर्शित करत असते. स्टार प्लस वाहिनीवर प्रदर्शित होणारी आगामी मालिका ‘फालतू’ ही एक अनोखी कथा आहे. जी मुलीच्या सामर्थ्याबद्दल समाजाला संदेश देते. ‘फालतू’ मालिका स्टार प्लसवर प्रदर्शित होणार असून प्रेक्षक या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे ‘फालतू’ची कथा कशी उलगडते हे पाहणे नक्कीच उत्कंठावर्धक असणार आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!