23 C
Mumbai
Thursday, January 16, 2025
Homeमनोरंजनतेजस देऊस्कर दिग्दर्शित ‘देवमाणूस’मध्ये झाली सुबोध भावे यांची एन्ट्री  

तेजस देऊस्कर दिग्दर्शित ‘देवमाणूस’मध्ये झाली सुबोध भावे यांची एन्ट्री  

अभिनेता सुबोध भावे बरोबर या चित्रपटात महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यासारखे दिग्गज कलाकार दिसणार आहेत, त्यामुळे हा चित्रपट एक मल्टिस्टारर चित्रपट असणार आहे. (Subodh Bhave's entry was in 'Devmanus' directed by Tejas Deoskar)

तेजस देऊस्कर दिग्दर्शित ‘देवमाणूस’ या बहुप्रतिक्षित चित्रपटात आता अभिनेते सुबोध भावे सामील झाले आहेत. अभिनेता सुबोध भावे बरोबर या चित्रपटात महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यासारखे दिग्गज कलाकार दिसणार आहेत, त्यामुळे हा चित्रपट एक मल्टिस्टारर चित्रपट असणार आहे. (Subodh Bhave’s entry was in ‘Devmanus’ directed by Tejas Deoskar)

‘देवा’ चित्रपट माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे: शाहिद कपूर

सुबोध भावे यांनी याआधी बालगंधर्व, आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर, कट्यार काळजात घुसली, यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. त्यांनी दरवेळी वेगवेगळे पात्र साकारले आहेत. (Subodh Bhave’s entry was in ‘Devmanus’ directed by Tejas Deoskar)

सनी देओलच्या ‘बॉर्डर 2’ चित्रपटाचे शूटिंग झाली सुरू

देवमाणूसच्या कलाकारांसोबत सामील होण्याबद्दल अभिनेता सुबोध भावे म्हणाले , “मला यापूर्वी दिग्गज अभिनेता महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे या दोघांसोबत स्वतंत्रपणे चित्रपटात काम करण्याचा बहुमान मिळाला आहे, परंतु देवमाणूसमध्ये पहिल्यांदाच त्यांच्यासोबत एकत्र काम करणे हा खरोखरच माझ्यासाठी एक रोमांचक अनुभव आहे. या अविश्वसनीय चित्रपटाचा एक भाग होण्यासाठी मी खूप उत्साहित आहे आणि आमचे सामूहिक प्रयत्न पाहून प्रेक्षकांकढून कसा प्रतिसाद मिळतो हे सुद्धा पाहण्यासाठी मी आतुर आहे.” (Subodh Bhave’s entry was in ‘Devmanus’ directed by Tejas Deoskar)

देवमाणूस या चित्रपटाचे इतर तपशील जरी गुपित असले तरी, चित्रपटाच्या निर्मात्यांनी आधीच एक प्रकारची कास्टिंगची माहिती देऊन निश्चितच या सिनेमासाठी प्रेक्षकांची आवड निर्माण केली आहे. (Subodh Bhave’s entry was in ‘Devmanus’ directed by Tejas Deoskar)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी