29 C
Mumbai
Monday, August 28, 2023
घरमनोरंजनसनी पाजीच्या गदर २ ने अक्षय कुमारचा ओएमजी २, रजनीकांतच्या जेलरला मागे...

सनी पाजीच्या गदर २ ने अक्षय कुमारचा ओएमजी २, रजनीकांतच्या जेलरला मागे टाकत कमावले इतके कोटी!

नेत्वा धुरी, मुंबई :  सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या गदर ‘2’ या चित्रपटाने आतापर्यंत 450 कोटी रुपयांची कमाई केली आहे. कोरोनापासून सिनेमाघरांकडे पाठ फिरवणाऱ्या प्रेक्षकांना पुन्हा सिनेमा घरांकडे आणण्यात गदर ‘2’चा महत्वाचा वाटा असल्याने थिएटर मालकांनीही आनंद व्यक्त केला. 2001 साली प्रदर्शित झालेल्या ‘गदर-एक प्रेम कथा’ या हिट चित्रपटाचा गदर 2 हा सिक्वल आहे. पाहिला भाग दणदणीत यशस्वी झाल्यानंतर तब्ब्ल 23 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गदर2 रिलीज झाला. 11 ऑगस्टला गदर2 रिलीज झाल्यानंतर पहिल्याच विकेंडला गदर -2 ने 121 कोटी रुपयांची कमाई केली. गदर 2 च्या सोबत अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम यांचा ‘ओह माय गॉड’ तर सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘जेलर’ चित्रपट प्रदर्शित झाला. ‘ओह माय गॉड’ आणि ‘जेलर’ चित्रपटाला सुरुवातीपासूनच ‘गदर 2’मुळे कमी प्रेक्षक मिळाले.

गदर 2 मुळे गेल्या वीस वर्षांपासून हिट चित्रपटासाठी आसूसलेल्या अभिनेत्री अमिषा पटेल आणि सनी देओल यांच्या करियरलाही नवी उमेद मिळाली आहे. करियरच्या सुरुवातीलाच अमिषाने ‘कहो ना प्यार है’ आणि ‘गदर-एक प्रेम कथा’ दोन लागोपाठ हिट चित्रपट दिले. त्यानंतर अमिषाचे चित्रपट चालले नाही. सनी देओल तर चित्रपटापासून फार काळ लांबच राहिला. गेल्या काही काळात सनीचा ‘घायल 2’ चित्रपट दणाणून आपटला. मुलाच्या पदार्पणासाठी सनी देओलने दिग्दर्शनात प्रयत्न करून पाहिले. सनीच्या दिग्दर्शनातील पदार्पणाला ‘पल पल दिल के पास’ प्रेक्षकांनी पाठ फिरवली.

हे सुद्धा वाचा 

गोदावरी, एकदा काय झालं चित्रपटांची राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर; सांगलीच्या शेखर रणखांबेच्या रेखा माहितीपटाला पुरस्कार

Aryan Khan : शाहरुख-गौरीचा मुलगा करणार मनोरंजन क्षेत्रात डेब्यू; आर्यनच्या खांद्यावर विशेष जबाबदारी 

Happy Birthday Richa Chadda | ‘नगमा खातून’ तर कधी ‘भोली पंजाबन’ बनून केलं प्रेक्षकांचं मनोरंजन, वाचा अभिनेत्री रिचा चड्ढाबद्दल…

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘पठाण’ आणि ‘बाहुबली2’ नंतर ‘गदर 2’ चित्रपटाने 400 कोटीपर्यंतची कमाई केली. तिसऱ्या आठवड्यातही सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. शुक्रावारपासून विकेंडपर्यंत ‘गदर2’ ने 16 कोटी रुपये कमावले. चिटपट लवकरच 500 कोटी रुपयांचा टप्पा पार करण्याची दाट शक्यता आहे.
कोरोनाकाळात गदर2चे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले. या चित्रपटामुळे उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर यांच्या करियरला नवे वळण मिळाले आहे. उत्कर्षचाही पदार्पणाचा चित्रपट अजिबात चालला नाही. पंजाबी चित्रपटात काम करणाऱ्या सिमरत कौरला ‘गदर2’ चित्रपटामुळे ओळख मिळाली. सनी देओल आणि अमिषा पटेल या दोघांचेही करियर नव्याने सुरु झाल्याने त्यांना आता चांगल्या चित्रपटाच्या ऑफर्स येतील अशी अपेक्षा चित्रपट समीक्षकांनी व्यक्त केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी