28 C
Mumbai
Saturday, September 16, 2023
घरमनोरंजनस्वरा भास्करचे बेबी बंप फोटोशुट झाले व्हायरल !

स्वरा भास्करचे बेबी बंप फोटोशुट झाले व्हायरल !

बॉलिवुड अभिनेत्री स्वरा भास्कर लवकरच आई होणार आहे. नुकतेच तीने मॅटरनिटी फोटोशुट केले असून फोटो तीने सोशल मीडियावर अपलोड केले आहे. तिच्या या फोटोंवर अनेकांनी कमेंटकरत शुभेच्छा दिल्या तर काहींनी तिला ट्रोल देखील केले आहे.

Swara Bhaskar maternity photoshoot flaunted her baby bump
स्वरा भास्करने फहद अहमदसोबत विवाह केला आहे. तिचा पती सामाजिक कार्यकर्ता आणि समाजवादी पक्षाचा नेता आहे. स्वरा तिच्या रोखठोक स्वभावामुळे परिचीत आहे. ती धर्मनिरपेक्ष राजकीय विचारधारेचे नेहमीच प्रतिनिधीत्त्व करत आली आहे. अनेकदा राजकीय, धार्मिक मुद्द्यांवर ती आपले मत स्पष्टपणे मांडत असते.
Swara Bhaskar maternity photoshoot flaunted her baby bump

स्वरा भास्करने तनु वेड्स मनू, मछली जल की राणी है, प्रेम रतन धन पायो, वीरे दी वेडिंग अशा अनेक चित्रपटात अभिनय केला आहे. दूरदर्शनवरील रंगोली या चित्रपट गितांच्या कार्यक्रमातून ती घराघरात पोहचली. तर श्याम बेनेगल दिग्दर्शित संविधान या सिरीजमध्ये निवेदक म्हणून देखील तीने काम केले.
Swara Bhaskar maternity photoshoot flaunted her baby bump

फहद अहमद सोबत तीने आधी कोर्ट मॅरेज केले होते. त्यानंतर मार्च 2023 मध्ये पारंपरिक पद्धतीने तीने विवाह केला. त्यानंतर काही महिन्यातच तीने प्रेग्नन्सींची गुड न्यूज दिली. नुकतेच तीने बेबी बंप प्लॉटींगचे फोटोशुट केले आहे.
Swara Bhaskar maternity photoshoot flaunted her baby bump

स्वराच्या या फोटोशुट मध्ये तीने भगव्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. तीच्या या फोटोशूटवर अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या तर अनेकांनी तिला ट्रोल देखील केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी