स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँ साहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांसारखे रयतेचे राजे घडविले. रयतेच्या स्वराज्याची संकल्पना त्यांनी शिवबांच्या हिंदवी स्वराज्याव्दारे वास्तवात घडवून आणली, अशा कुशल, पराक्रमी जिजाऊ माँ साहेबांच्या कर्तृत्त्वाचा इतिहास ‘स्वराज्य कनिका -जिऊ’ चित्रपटातून लवकरच समोर येणार आहे. (Swarajya Kanika-Jiu Movie Poster Released; Ishwari Deshpande as Jijau Ma Saheb)
‘६ फायरफ्लाईज प्रॉडक्शन्स’ प्रस्तुत अनुजा देशपांडे निर्मित आणि प्रितम एस.के. पाटील लिखित-दिगदर्शित ‘स्वराज्य कनिका -जिऊ’ या चित्रपटातून जिजाऊ माँ साहेबांचे कार्य जगासमोर येणार आहे. जिजाऊ माँ साहेबांच्या ४२५ व्या जयंतीचे औचित्य साधत नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. हा चित्रपट १२ जानेवारी २०२४ साली प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
ईश्वरी देशपांडे (Ishwari Deshpande) हा एक नवीन चेहरा सिनेविश्वात या चित्रपटातून पदार्पण करत आहे. ती जिजाऊ माँ साहेबांच्या बालपणीची भूमिका या चित्रपटात साकारत आहे. ईश्वरीसह या चित्रपटात आणखी कोणते कलाकार दिसणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.
हे सुद्धा वाचा
What An Idea : 500 स्क्वेअर फुटाचे एका बॉक्समध्ये फोल्ड करून कुठेही नेता येणारे अनोखे घर
एकनाथ शिंदे दावोसमध्ये जाऊन ठाकरेंवर करणार मात !
सत्यजित तांबे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज; देवेंद्र फडणवीसांच्या मैत्रीचा परिणाम?
चित्रपटाच्या पोस्टरमध्ये जगदंबेचा आशीर्वाद मिळत असून जिजाऊंच्या नजरेतील तीक्ष्णता अचूक हेरली आहे. निर्मात्या अनुजा देशपांडे यांचा ‘स्वराज्य कनिका -जिऊ’ हा पहिलाच चित्रपट असून या चित्रपटासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. तसेच चित्रपटाची कथा, संकल्पना ही अनुजा देशपांडे यांचीच आहे. तब्ब्ल चार वर्ष केवळ राजमाता जिजाऊ यांचा जीवनप्रवास अभ्यासत ‘स्वराज्य कनिका – जिऊ’ची निर्मिती करण्याचे शिवधनुष्य त्यांनी पेललं आहे.