25 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरमनोरंजनसेन्सॉर बोर्डाचे अधिकारी लाच मागतात; साऊथच्या अभिनेत्याकडून भांडाफोड

सेन्सॉर बोर्डाचे अधिकारी लाच मागतात; साऊथच्या अभिनेत्याकडून भांडाफोड

दाक्षिणात्य अभिनेता विशालनं मुंबईतील सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यानं चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यासाठी
लाच मागितल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी विशालनं थेट सोशल मीडियावर संपूर्ण प्रकरण उघडकीस आणल्यानंतर आता केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. मंत्रालयाकडून संबंधित अधिकाऱ्यांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

गुरुवारी विशालनं आपल्या सोशल मीडियावर ‘मार्क एंथॉनी’ चित्रपटाला हिंदी प्रमाणपत्र मिळवताना संबंधित सेंट्रल बॉर्ड अधिकाऱ्यांनी साडे सहा लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप केला. चित्रपट पाहण्याअगोदर आणि पहिल्यानंतर मला संपूर्ण रक्कम दोन टप्प्यात द्यावी लागली. मला संबंधित अधिकाऱ्याने प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पैसे द्यावे लागतात ही अट बंधनकारक केली. चित्रपट प्रदर्शनाची तारीख जवळ आल्यानं मला लाच देण्यावाचून पर्याय नव्हता. माझा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर माझा अनुभव सर्वांसमोर मांडतोय, अशी भावना विशालनं व्यक्त केली. याबाबतचे व्हिडिओ व अन्य पुरावे माझ्याकडे आहेत. या संपूर्ण प्रकरणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी विशालनं केली. संबंधित सहा लाखांची रक्कम माझ्या मेहनतीची आहे. ही रक्कम भ्रष्टाचार पोसण्यासाठी खर्च होता कामा नये, असंही विशाल म्हणाला.

विशालचा व्हिडिओ प्रसारित होताच केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयानं या प्रकरणाची दखल घेतली. या प्रकरणावर मंत्रालयाने खेद व्यक्त केला. विशालचं ‘एक्स’ या सोशल मीडियावरील ट्विट मंत्रालयाने रिट्विट करून संपूर्ण प्रकरणाविषयी दिलगिरी व्यक्त केली. सिनेमाला प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया आता ऑनलाईन माध्यमातून उपलब्ध आहे. संपूर्ण प्रक्रियेत कुठेही एजंट नाहीयेत. प्रमाणपत्र उपलब्ध करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया उपलब्ध असताना काही राज्यात एजंटचा वापर केला जात आहे. मंत्रालय या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश देत असल्याचे माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या ‘एक्स’ या सोशल मीडिया अकाऊंटवरुन सांगण्यात आले.

हे ही वाचा 

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढाचं रिसेप्शन होणार मुंबईत; तारीख देखील ठरली !

जान्हवी कपूर पॉर्न चित्रपटात? खुद्द अभिनेत्रीनेच सांगितलं सत्य

अभिनेता मायकेल गॅम्बन यांचे निधन; हॉलिवुडमध्ये पाच दशकांची कारकीर्द

विशालनंही संबंधित मंत्रालयाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धन्यवाद दिले. विशाल प्रामुख्याने मल्याळी आणि तामिळ भाषिक सिनेमात काम करतो. त्याचं ‘टम टम’ गाण्याचं रील इंस्टाग्रामवर खूप प्रसिद्ध झालंय. विशाल आणि ‘फॅमिली मॅन २’ फॅम समांथाची जोडी भरपूर गाजली आहे. विशाल प्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपटातील निर्मात्याचा मुलगा आहे. याआधीही विशालनं दाक्षिणात्य सिनेमातील चुकीच्या गोष्टींना वाचा फोडली आहे. आम्ही कलाकार चित्रपटातून भ्रष्टाचाराला विरोध करतो. खऱ्या आयुष्यातही भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन करायला भूमिका घेणं गरजेचं आहे, असं विशालनं सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सना आवाहन केलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी