28 C
Mumbai
Saturday, March 18, 2023
घरमनोरंजनसोनालीच्या 'डेटभेट'साठी प्रेक्षक झालेत आतुर !

सोनालीच्या ‘डेटभेट’साठी प्रेक्षक झालेत आतुर !

या नव्या चित्रपटामुळे व्हॅलेंटाइन्स डे निमित्ताने तरुणाईला खास मेजवानी मिळणार आहे हे मात्र नक्की.

‘अप्सरा आली’ या गाण्यातून तिचे मनमोहक सौंदर्य आणि नृत्याविष्काराने अवघ्या महाराष्ट्राला वेडं लावणाऱ्या सोनाली कुलकर्णीचा (Sonalee Kulkarni) एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोनाली लवकरच दिग्दर्शक लोकेश गुप्ते (Lokesh Gupte) यांच्या ‘डेटभेट’ (Date Bhet) या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि प्रेक्षकसुद्धा याची आतुरतेने वाट पाहत आहेत. (The audience is eager for Sonalee’s Date Bhet movie!)

अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि झाबावा एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत लोकेश विजय गुप्ते यांचा डेटभेट हा चित्रपट 24 फेब्रुवारी रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सोनाली ही अनया पंडित ही काल्पनिक व्यक्तिरेखा साकारत आहे. जी बिनधास्त, हुशार आणि एकदम फिल्मी आहे. या चित्रपटात तिच्यासोबत हेमंत ढोमे, संतोष जुवेकर, मुग्धा गोडबोले, उदय टिकेकर, मृणाल देशपांडे आणि सुजाता जोशी हे प्रमुख पात्रांची भूमिका बजावताना दिसणार आहेत.

दरम्यान, ‘डेटभेट’च्या टीमने गेल्या वर्षी लंडनमध्ये या महामारीच्या काळात चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते. लोकेश गुप्तेने त्याच्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेयर करत त्याच्या आगामी चित्रपटाच्या टीमला निरोप दिला. लोकेश यांनी सोनाली कुलकर्णी आणि हेमंत ढोमे यांच्यासोबतचे सुंदर फोटो शेअर केले होते.

सोनालीने टाकलेल्या सोशल मीडियावरील पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या चाहत्यांनीसुद्धा कमेन्टचा वर्षाव करीत तिला शुभेच्छा दिल्या आणि चित्रपटासाठी आतुर असल्याचे दिसून आले. सोनालीच्या नव्या चित्रपटामुळे व्हॅलेंटाइन्स डे निमित्ताने तरुणाईला खास मेजवानी मिळणार आहे हे मात्र नक्की.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

हे सुद्धा वाचा : सिनेमा सिक्वेलपेक्षा सीझनचा बोलबाला

स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार विकी कौशल

Balasaheb Thorat : मराठी चित्रपट आणि चित्रपटगृहे पुनर्जीवित करण्याला प्राधान्य : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन लोकेश विजय गुप्ते यांनी केले आहे.तसेच निर्माती शिवांशु पांडे, हितेश रुपरेलिया आणि स्वाती खोपकर यांनी केली. त्याचप्रमाणे निनाद नंदकुमार बत्तीन, तबरेज पटेल, प्रशांत जम्मूवाला, हनी शर्मा हे सह-निर्माते आहेत.

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आज मराठी कलाविश्वात एक सुप्रसिद्ध चेहरा आहे. अप्रतिम अभिनयाने  सोनालीने अगदी कमी कालावधीत सिनेसृष्टीत आपलं नाव कोरलं. मराठीसोबत सोनाली बॉलिवूडमध्येही काही सिनेमांमध्ये दिसली होती. सोनाली कुलकर्णीने दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. सोनालीला खरी ओळख मिळाली ती दिग्दर्शक रवी जाधव यांच्या ‘नटरंग’ या चित्रपटातून. या चित्रपटात तिने केलेले लावणीनृत्य प्रचंड गाजले. त्यातील ‘अप्सरा आली’ या गाण्यातून तिचे मनमोहक सौंदर्य आणि नृत्याविष्कार पाहून अवघ्या महाराष्ट्राला तिने वेडं लावले.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी