29 C
Mumbai
Friday, September 2, 2022
घरमनोरंजनLiger :'लायगर' चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच तेलगु भाषिकांची सर्वांत जास्त पसंती

Liger :’लायगर’ चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच तेलगु भाषिकांची सर्वांत जास्त पसंती

25 ऑगस्टला 'लायगर' चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. हा चित्रपट विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांचा आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी सुमारे 23 लाखांची तिकीटे ॲडव्हान्स बुकिंग झाली आहेत. हिंदी भाषीक राज्यांपेक्षा तेलगु भाषेत याची सर्वांत जास्त तिकीट विक्री झाली आहे

25 ऑगस्टला ‘लायगर’ चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. हा चित्रपट विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांचा आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी सुमारे 23 लाखांची तिकीटे ॲडव्हान्स बुकिंग झाली आहेत. हिंदी भाषीक राज्यांपेक्षा तेलगु भाषेत याची सर्वांत जास्त तिकीट विक्री झाली आहे. ‘लायगर’ हा दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाचा स्पोर्ट्स ॲक्शिन चित्रपट आहे. हा चित्रपट 25 ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शत होत आहे. पुरी जगन्नाथ दिग्दर्शित हा चित्रपट लोकांना आवडण्याची शक्यता याच्या विक्रीवरूनच समजते आहे.

या चित्रपटांच्या प्रदर्शनापूर्वीच ॲडव्हान्स बुकिंगद्वारे होणाऱ्या बॉक्स ऑफ‍िस कलेक्शनवर परिणाम होऊ लागला आहे.
बॉयकॉट बॉल‍िवूड, बॉयकॉट लाल सिंग चड्ढा हे अलिकडे‍ रसिकांना जास्त आवडलेले चित्रपट आहेत. ‘लायगर’ची हिंदी भाषेसाठी 9,832 ऑनलाईन तिकीटांची बुकींग झाली आहे. म्हणजेच आदल्या द‍िवशी 23 लाखांची कमाई झाली आहे. मात्र तेलगु भाष‍िक राज्यांमध्ये या चित्रपटला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

तेलगुमध्ये ‘लायगर’ची सुमारे 4 लाख 9,742 तिकीटे विकली गेली आहेत. म्हणजेच तेलगु चिपत्रपटासाठी 7.30 कोटीची कमाई प्रदर्शना पूर्वीच झाली आहे. ताम‍िळ, मल्याळम आणि कन्नड भाषेतील चित्रपटाची अनुक्रमे 7565, 944 आणि 173 अॅडव्हान्स तिकीटाचे बुकींग झाले आहे. हा चित्रपट पहिल्याच दिवशी 25 कोटींची कमाई करु शकणार आहे. या चित्रपटाचे बजेट 90 कोटींच्या घरात आहे.

हे सुद्धा वाचा

Uday Samant :’ते’ घोषणा न देणारे 15 आमदार शिंदे गटात येणार – उदय सामंत

Leopard : बिबट्याला घाबरुन 18 दिवसांपासून 22 शाळांना सरकारने लावले कुलूप

Eknath Khadse : प्रश्नोत्तरांच्या तासाला ‘एकनाथ खडसे’ यांनी सत्ताधाऱ्यांना चांगले ‘खडसावले’

विजय देवरकोंडाचे सुप्रसिद्ध 10 चित्रपट
महानतीऱ- 2018, पेली चोपुलु- 2016, अर्जुन रेड्डी-2017, गीता गोविंदम- 2018, येवडे सुब्रमण्यम- 2015, डिअर कॉमरेड- 2019, टॅक्सीवाला- 2018, नोटा- 2018, वर्ल्ड फेमस लवर-2020, द्वारका- 2017.

विजय देवरकोंडा ‘साई’ या नावाने देखील ओळखला जातो. तो निर्माता देखील आहे. तो उदयोजक आहे. त्याचा जन्म तेलंगणामधील अचमपेटमध्ये झाला. त्याने 2011 मध्ये ‘नुव्विला’ नावाच्या रोमांटीक कॉमेडीने अभिनयात पदार्पण केले.‍

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी