38 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
Homeमनोरंजन'द केरला स्टोरी'च्या निर्मात्याला भर चौकात फासावर...; जितेंद्र आव्हाड कडाडले

‘द केरला स्टोरी’च्या निर्मात्याला भर चौकात फासावर…; जितेंद्र आव्हाड कडाडले

सध्या संपुर्ण देशात ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावरून वाद सुरू आहे. कथित लव्ह जिहादवर आधारित ‘द केरला स्टोरी’ वरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकात भरसभेत या चित्रपटाबद्दल वक्तव्य केल्यानंतर हा वाद आणखी वाढला आहे. भाजप शासित राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री केला जात आहे, तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकारने या चित्रपटावर बंदी घातली आहे. अशातच केरळ राज्य आणि तेथील महिलांची बदनामी करणाऱ्या ‘द केरला स्टोरी’च्या निर्मात्याला भरचौकात फासावर लटकावलं पाहिजे, असं खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

गेल्या आठवड्यात ‘द केरला स्टोरी’ रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केले. तर विपूल अमृतलाल शाह चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटात नर्स बनण्याची इच्छा असलेल्या मुलींची कथा आहे. मात्र त्या ISIS च्या जाळ्यात अडकून दहशतवादी होतात. या चित्रपटात धर्म परिवर्तनाचा मुद्दा देखील उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे ‘द केरला स्टोरी’ चांगलाच वादात सापडला आहे. यावर देशभरातून प्रतिक्रीया उमटत असून आता महाराष्ट्राच्या नेत्यांनीसुद्धा उडी घेतली आहे. अशातच चित्रपटाच्या नावाखाली एका राज्याची आणि तेथील महिलांची बदनामी करण्यात आली. अधिकृत आकडा 3 महिलांचा असून, चित्रपटात 32 हजार दाखवण्यात आलं आहे. ज्याने या चित्रपटाची निर्मिती केली आहे, त्याला सर्वाजनिकरित्या फासावर लटकवलं पाहिजे,” असं सुचक विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं.

केरळच्या नावाने प्रदर्शित झालेला चित्रपट हा खोटारडेपणाच्या परमोच्च स्थानावर आहे. केरळची सत्य परिस्थिती वेगळीच आहे. विदेशातून भारतात येणारा जो पैसा आहे, त्याच्यातील 36 टक्के पैसा हा केरळचे नागरिक पाठवतात. गेल्यावर्षी त्यांनी 2.36 लाख कोटी रुपये पाठवले होते. केरळचा साक्षरतेचा दर 96 टक्के आहे, भारताचा 76 टक्के आहे. केरळमध्ये दारिद्र्य रेषेखाली राहणाऱ्या नागरिकांची संख्या 0.76 टक्के आहे. देशातील दारिद्र्य रेषेखालील नागरिकांची संख्या 22 टक्के आहे. बालमृत्यूचे प्रमाण केरळमध्ये 6 टक्के आहे. आसाममध्ये 42 टक्के तर, उत्तरप्रदेशमध्ये 46 टक्के आहे. केरळचे दरडोई उत्पन्न हे भारताच्या 7 टक्के अधिक आहे,” अशी माहिती ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

त्या चित्रपटामध्ये 32 हजार महिलांची कथा सांगितली गेली. त्याबद्दल स्वतः चित्रपटाचा निर्माता म्हणाला की, ही कथा फक्त 3 महिलांची आहे. चित्रपट चालण्यासाठी 32 हजार महिला सांगितल्या होत्या. म्हणजे एकंदरीत काय तर आपल्या महिला भगिनींची बदनामी करायची. आपल्या महिला भगिनी मूर्ख आहेत, त्यांना काही समजतच नाही, त्या वाटेल तशा वागतात असे प्रदर्शित करायचं,” असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.

हे सुद्धा वाचा : 

The Kerala Storyचा बॉक्स ऑफिसवर धुव्वा; वादग्रस्त ठरूनही करतोय कोटींची कमाई

TDM चित्रपटाला शोज मिळेना! अभिनेता भावूक; अजित पवारांची प्रतिकिया

तब्बल 15 वर्षांनंतर आमिर करतोय ‘गजनी’च्या सिक्वेलची तयारी!

Jitendra awhad, The Kerala Story, The Kerala Story Producer should hanged in public, Jitendra awhad on The Kerala Story Producer should hanged in public

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी