सुबोध भावे दिग्दर्शित “संगीत मानापमान” या चित्रपटाचे नवीन गाणं ‘ऋतु वसंत’ प्रदर्शित झाला आहे. सुबोध भावे, वैदेही परशुरामी बरोबरच खुद्द शंकर महादेवन आणि बेला शेंडे ही या बहारदार गाण्यावर थिरकताना दिसतायत. वसंत ऋतूला साजरा करणाऱ्या या गाण्यात 500 हून अधिक डान्सर्स झळकणार आहे. (The song ‘Ritu Vasant’ from the movie “Sangeet Manapmaan has been released.)
पारंपरिक वेशभुषा, कमालीचं नृत्य आणि गाण्यातील साधेपणा थेट प्रेक्षकांच्या मनाला भिडणार आहे. याच बरोबर शंकर महादेवन आणि बेला यांचे सुमधुर स्वर चार चाँद लावत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडतायत. गाण्यात सुबोध भावे आणि वैदेही परशुरामी ह्या दोघां कलाकारांची केमिस्ट्री सुद्धा कमालीची दिसतेय. (The song ‘Ritu Vasant’ from the movie “Sangeet Manapmaan has been released.)
झी स्टुडिओज’ सादर करीत आहेत, ‘आता थांबायचं नाय!’
या गाण्याचे बोल समीर सामंत ह्यांनी लिहिले आहेत. शंकर एहसान लॉय यांचं संगीतही तितक्याच ताकदीचे आहे. त्यामुळे हे गाणं नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरून तरुण पिढीलाही थिरकायला लावेल एवढं नक्किच. एखादा लढा जिंकून आल्यावर जो भाव एका मावळ्याच्या मनात असतो तशीच काहीशी भावना, तोच जश्न ह्या सुरेख सिम्पल गाण्यात आपण बघू शकतो. (The song ‘Ritu Vasant’ from the movie “Sangeet Manapmaan has been released.)
शिवाली परबच्या ‘मंगला’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
आगामी मराठी संगीतमय चित्रपट ‘संगीत मानापमान’ साठी दिग्गज संगीतकार शंकर-एहसान-लॉय ह्यांनी मंत्रमुग्ध करणारी एकूण 14 गाणी कंपोज केली आहेत. तर ह्या गाण्यांना 18 नामवंत गायकांनी गायलं आहे. हा चित्रपट 10 जानेवारी 2025 ला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. (The song ‘Ritu Vasant’ from the movie “Sangeet Manapmaan has been released.)
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे आणि श्री गणेश मार्केटिंग निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित “संगीत मानापमान” ची म्युझिक कंपनी सारेगामा आहे. चित्रपटात सूबोध भावे, सुमित राघवन, वैदेही परशुरामी, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ, शैलेश दातार, अर्चना निपाणकर आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाचे पटकथा आणि कथाविस्तार शिरीष गोपाळ देशपांडे आणि ऊर्जा देशपांडे यांचे आहे तर अतिरिक्त पटकथा आणि संवाद पटकथा प्राजक्त देशमुख यांनी केले आहे. (The song ‘Ritu Vasant’ from the movie “Sangeet Manapmaan has been released.)