‘द कश्मीर फाइल्स’च्या यशानंतर विवेक अग्निहोत्रीने त्याच्या आगामी ‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी शेअर केला. या चित्रपटाची निर्मिती पल्लवी जोशी यांनी केली आहे. हा भारतातील पहिला जैव-विज्ञान चित्रपट आहे.
‘द कश्मीर फाइल्स’ या त्याच्या शेवटच्या प्रकल्पाच्या यशानंतर विवेक अग्निहोत्री यांनी हा चित्रपट तयार केला आहे. या चित्रपटात अनुपम खेर, नाना पाटेकर, सप्तमी गौडा आणि पल्लवी जोशी, गिरीजा ओक – गोडबोले मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
View this post on Instagram
भारतातील कोविड-१९ महामारीदरम्यान कोवॅक्सिन या लसीच्या विकासाची खरी कहाणी सांगण्यासाठी या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘द व्हॅक्सिन वॉर’चा ट्रेलर लसींच्या विकासामागील भारतीय शास्त्रज्ञांच्या संघर्षाबद्दल भाष्य करतो आणि पडद्याआड गेलेल्या अनेक कथा उलगडतो, अशी माहिती दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी दिली.
सामान्यतः Covaxin म्हणून ओळखल्या जाणार्या स्वदेशी BBV152 लस विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्या शास्त्रज्ञांच्या समर्पणाचे प्रदर्शन करणारा चित्रपटाबाबत अनेकांना उत्सुकता आहे . ही लस भारत बायोटेकने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या भागीदारीत विकसित केली आहे. ही लस निर्माण करण्यात शास्त्रज्ञाचा संघर्ष या चित्रपटात मांडण्यात आलाय.
हे ही वाचा
विवेक अग्निहोत्री यांच्या गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘कश्मीर फाईल्स’ चित्रपटामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र सिनेमाला खूप प्रसिद्धीही मिळाली. काश्मिरी पंडितांच्या अत्याचाराबाबत हा सिनेमा आधारला होता.