28 C
Mumbai
Sunday, September 4, 2022
घरमनोरंजनUnad Movie : झ्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'उडान'ची निवड

Unad Movie : झ्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘उडान’ची निवड

उनाड ही कथा महाराष्ट्रातील हर्णे येथील एका छोट्या गावातील मासेमारी करणाऱ्या तीन तरुणांची आहे. शुभ्या, बंड्या व जमील असे तीन तरुणांची नावे आहेत. हे तीनही ध्येय नसलेले तरुण गावात दिवसभर हुंदडत असतात. त्यांच्या या वागणुकीमुळे गावातील लोक त्यांना उनाड समजत असतात. परंतु असे काहीतरी घडते की त्यांचे आयुष्यच पार बदलून जाते हेच दाखण्याचा प्रयत्न सिनेमात करण्यात आला आहे.

जिओ स्टुडिओजचा ‘उनाड’ सिनेमा 2023 या वर्षी सिनेमागृहात प्रदर्शित होणार असला तरीही त्याच्याविषयी आतापासूनच खमंग चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेमागे कारण सुद्धा तसेच आहे, उडानची ‘चेक रिपब्लिक’ (Czech Republic) येथे पार पडलेल्या झ्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (Zlin International Film Festival) युवा विभागातील फिचर फिल्म्सच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरीता अधिकृत प्रवेशिका म्हणून नुकतीच निवड करण्यात आली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदारने (Aditya Sarpotdar) याने केले आहे, तर आशुतोष गायकवाड, हेमल इंगळे, अभिषेक भराटे, चिन्मय जाधव, देविका दफ्तरदार आणि संदेश जाधव या कलाकारांनी सिनेमात मुख्य भूमिका साकारली आहे.

झ्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झालेल्या उनाड या सिनेमाने प्रदर्शनाआधीच प्रेक्षकांच्या मनात विशेष जागा बनवली आहे, त्यामुळे सिनेमा रिलीजची प्रेक्षक अगदी आतूरतेने वाट पाहत आहेत. यावेळी बोलताना दिग्दर्शक आदित्य सरपोतदार म्हणाले, ‘उनाड’ हा सिनेमा तरूणांवर चित्रीत करण्यात आला असून हा सिनेमा पुढील वर्षी उन्हाळ्यात प्रदर्शित होत आहे. हा सिनेमा युवकांना योग्य दिशा दाखवणारा ठरेल अशी मला आशा आहे, असे म्हणून त्यांनी या चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढवली आहे.

हे सुद्धा वाचा…

Ajit Pawar : फडणवीसांचे म‍ित्र प्रेम,अजित पवारांकडेच ‘देवगिरी’ बंगल्याच्या चाव्या

Elections :निवडणुकीत केल्या जाणाऱ्या मोफत योजनांच्या घोषणांवर सुप्रिम कोर्टात सुनावणी

Jayant Patil : जयंत पाटील यांनी व‍िधानसभा अध्यक्षांवरच डागली तोफ !

उनाड ही कथा महाराष्ट्रातील हर्णे येथील एका छोट्या गावातील मासेमारी करणाऱ्या तीन तरुणांची आहे. शुभ्या, बंड्या व जमील असे तीन तरुणांची नावे आहेत. हे तीनही ध्येय नसलेले तरुण गावात दिवसभर हुंदडत असतात. त्यांच्या या वागणुकीमुळे गावातील लोक त्यांना उनाड समजत असतात. परंतु असे काहीतरी घडते की त्यांचे आयुष्यच पार बदलून जाते हेच दाखण्याचा प्रयत्न सिनेमात करण्यात आला आहे.

‘झ्लिन’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा जगातील सर्वात जुना, प्रतिष्ठित असा महोत्सव आहे. हा महोत्सव मुलांसाठी आणि किशोरवयीन मुलांसाठी चित्रपट निर्मितीच्या नवीन संधींची ओळख करून देणारा आहे. मागील महोत्सवात सुमारे 81 हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली होती, तर सिनेमाच्या स्क्रिनिंगला अकरा हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. या महोत्सवात जगभरातील 52 देशांतील 310 सिनेमांचा त्यावेळी समावेश होता.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी