34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमनोरंजनप्रेमाच्या दिनी दिले होते बलिदान.. व्हॅलेंटाईनचा थरारक इतिहास कसा होता; जाणून घ्या

प्रेमाच्या दिनी दिले होते बलिदान.. व्हॅलेंटाईनचा थरारक इतिहास कसा होता; जाणून घ्या

जगभरात 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन म्‍हणजे प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन्स डेच्या 7 दिवसांपूर्वी या वीकला सुरुवात होते. प्रेमींसाठी हा संपूर्ण आठवडा म्‍हणजे खास क्षणच असतात. एखाद्या व्यक्तीबद्दल मनात असलेल्या भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणून व्हॅलेंटाईन्स डेकडे पाहिले  जाते. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुलं किंवा चॉकलेट्स पाठवून प्रेम व्यक्त करतात. (Valentine day)

प्रेम आणि काळजी नसेल तर कोणत्याही नात्याला अर्थ राहत नाही आणि हे नातं जर जोडीदारासह असेल तर या दोन्ही भावनांची गरज भासते. प्रेम व्यक्त करण्यासाठी नक्कीच कोणत्याही मुहूर्ताची अथवा वेगळ्या दिवसाची गरज नाही असं अनेकांना वाटतं. मात्र व्हॅलेंटाईन्स डे हा खास प्रेमाचा दिवस १४ फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो? एखाद्या सणासारखे स्वरूप या दिवसाला का दिले गेले? त्याचप्रमाणे प्रेमाचा दिवस म्हणून हाच दिवस नक्की का निवडला गेला, यामागील इतिहास नक्की काय आहे हे आपण जाणून घेऊयात.

भारतातील पारंपरिक सणांमध्ये रक्षाबंधन, ईद, दिवाळी, ख्रिसमस सगळ्या धर्माचे सगळे सण साजरे होतात आणि त्यात भर पडली आहे ती पाश्चात्य देशातील सण व्हॅलेंटाईन डे ची. वॅलेंटाईन हे केवळ एकाच दिवसाचे काम नाही. तर एका पाद्री अर्थात संताचे नाव होते. जो रोम शहरात राहात होता. ह्याच संताने आपल्या प्रेमासाठी बलिदान देऊन हा प्रेम दिवस अमर केला आहे.

प्रेमाच्या दिनी दिले होते बलिदान.. व्हॅलेंटाईनचा थरारक इतिहास कसा होता; जाणून घ्या
A Real Terrific History of Saint Valentine’s Day

इ.स. २६९ ए.डी. काळात रोममध्ये राजा क्लॉडियसचे शासन होते. मात्र या शासकाने रोममधील कुटुंब असणाऱ्या व्यक्तींना सेनेत येण्यासाठी जबरदस्ती केली होती. याशिवाय पुरूषांवर लग्न करण्यासाठीही बंदी घालण्यात आली होती. ही गोष्ट कोणालाही पटली नव्हती मात्र शहरातील कोणत्याही रहिवाशांनी याविरुद्ध भाष्यही केले नाही. शासकाचा हा नियम पाद्री (संत) वॅलेंटाईनलादेखील पटला नव्हता.

एकदा एक जोडपे लग्न करण्यासाठी आले असता, एका खोलीत व्हॅलेंटाईनने त्या दोघांचे लग्न लावले. पण हे शासकाला कळले आणि यामुळे व्हॅलेंटाईनला पकडून कैद करण्यात आले व त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. पाद्री जेलमध्ये असताना त्याला अनेक लोकांकडून गुलाब आणि भेटवस्तू मिळू लागल्या. आम्ही सर्व प्रेमावर विश्वास ठेवतो अशा आशयाचे संदेश देखील त्याला देण्यात आले.

हे सुद्धा वाचा : थंडीच्या दिवसांमध्ये डिंकाचे लाडू आरोग्याला फायदेशीर

एक दिवस आजी-आजोबांसाठी

नरेंद्र मोदींचा २०२४ मध्ये पराभव अटळ (माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा विशेष लेख)

व्हॅलेंटाईनच्या फाशीचा दिवस होता १४ फेब्रुवारी, २६९ ए. डी., मात्र त्याने मरण्यापूर्वी एक पत्र लिहिले, ज्यामध्ये प्रेमासाठी आपण आपला जीव ओवाळून टाकत आहोत हे स्पष्ट केले होते. प्रेम हे सर्वस्व असून प्रेमासाठी वाट्टेल ते झेलण्याची आपली तयारी असल्याचेही त्याने यामध्ये नमूद केले होते असं सांगण्यात येते. म्हणूनच जगभरात १४ फेब्रुवारी हाच दिवस व्हॅलेंटाईनच्या आठवणीनिमित्त व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करण्यात येतो.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी