32 C
Mumbai
Wednesday, September 6, 2023
घरमनोरंजनवरुन धवन कोणाचे कापतोय केस; व्हिडीओ व्हायरल

वरुन धवन कोणाचे कापतोय केस; व्हिडीओ व्हायरल

अभिनेता वरूण धवन सध्या वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. एमॅझॉन प्राईमवर बवाल चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंत दिली. वरूण धवनच्या अज्जू भय्याच्या भूमिकेची सर्वांनी प्रशंसा केली. गेल्या 11 वर्षात वर्षात धवनचं करिअर स्लो एन्ड स्टेडी सुरु असताना त्यानं आता चक्क केस कापण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. इंस्टाग्राम स्टोरीमध्ये माहिती पोस्ट करत वरूण धवनने याबाबतची माहिती दिली.

मित्र अमोल मोहनला नवा हेअर कट देण्यासाठी चक्क वरूण धवननं पुढाकार घेतला. हातात कैची घेत वरून धवननंच अमोलचे केस कापले. आरशासमोर बसलेला अमोलला त्याची आवड निवड विचारात वरूणने त्याचे केस सहजरीत्या कापले. सध्या मुलांच्या केसांना ट्रिम केलं जातं. डोक्यासमोर नवा हेअर कट दिल्यानंतर वरूणनं मानेकडील केसांना ट्रीमही केलं. अमोलने स्वतःला आरशात पहिल्यानंतर वरुणची प्रशंसा केली. तू खरंच केस चांगले कापलेत या शब्दात अमोलनं वरूणचं कौतुक केलं. या व्हिडीओनंतर वरूण हेअर कटिंगबद्दल बरंच ज्ञान बाळगून आहे, अशी नेटकऱ्यांमध्ये प्रतिक्रिया उमटली.

हे सुद्धा वाचा
 नाना पटोलेंनी वाजवली हलगी  
इंडिया विरुद्ध भारत वादात आदित्य ठाकरे केंद्र सरकारवर संतापले
१९ सप्टेंबरपासून नव्या संसद भवनात सुरू होणार कामकाज, निवडला गणेश चतुर्थीचा मुहूर्त

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर वरूण ‘भेडिया’ सिनेमाच्या सिक्वेलमध्ये काम करणार आहे. एमॅझोन प्राईमच्या ‘सिटाडेल’ वेबसिरीजच्या हिंदी रिमेकमध्ये वरूण समांथासोबत झळकणार आहे. ‘बवाल’ सिनेमासाठी नवभारत टाईम्सनं वरूणला सर्वोकृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारानं सन्मानीत केलं. सध्या वरूण पुरस्कारामुळे खूप खुश आहे. वरूण आपल्या खासगी आयुष्याबाबत फारसं बोलणं पसंत करत नाही. पत्नी नताशासोबत वरूण प्रायव्हसीत राहणं पसंत करतो. पापाराझी फोटोग्राफर्सला पहिल्यानंतर दोघंही आनंदाने फोटोसाठी पोझ देतात. मात्र खासगी आयुष्याबाबत बोलणं टाळतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी