25 C
Mumbai
Friday, September 8, 2023
घरमनोरंजनलहानग्या कन्हैय्यांसोबत अभिनेता विकी कौशलनं फोडली दहीहंडी !

लहानग्या कन्हैय्यांसोबत अभिनेता विकी कौशलनं फोडली दहीहंडी !

अभिनेता विकी कौशल सध्या ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यशराज बॅनरची निर्मिती असलेल्या ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ चित्रपटात विकी सोबत अभिनेत्री मानुषी छिल्लरदेखील झळकणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने गुरुवारी विकी कौशलने दहीहंडी खेळली. विकी चित्रपटाच्या प्रमोशन निमित्ताने श्रीकृष्णाचे कपडे परिधान केलेल्या कन्हैयांनाही भेटला.

१४ ऑगस्ट रोजी विकी कौशल्य इंस्टाग्रामवर चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली होती.
येत्या २२ सप्टेंबर रोजी ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. गेल्या आठवड्यात चित्रपटाचा पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलं. ‘कन्हैया ट्विटर पे आजा’ गाण्याच्या प्रमोशनसाठी विकी इंस्टाग्राम इन्फ्लुएजरसोबत रील बनवतोय. जन्माष्टमी निमित्ताने लहान मुलांना भेटतोय. दहीहंडीच्या दिवशी तर चक्क विकीला दहीहंडी फोडण्याची संधी मिळाली. “दहीहंडी, पाऊस आणि माझ्यात ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’चं प्रेम, तुम्हा सर्वांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा. येत्या २२ सप्टेंबरला जवळच्या सिनेमागृहात भेटू ” अशी पोस्ट इंस्टाग्रामवर विकीने लिहिली.

यशराज बॅनर अंतर्गत विकी पहिल्यांदाच काम करतोय. मानुषी छिल्लरला अभिनेता अक्षय कुमारसोबत यशराज फिल्मनंच ‘ पृथ्वीराज चौहान’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये लॉन्च केलं. यशराज फिल्म्स नवोदय कलाकारांकडून तीन सलग चित्रपटांसाठी करार करते. ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’साठी यशराज फिल्म्सनं मानुषीला निवडलं.

हे सुद्धा वाचा 
राजकारणात अस्पृश्यता पाळली जाते – ॲड. प्रकाश आंबेडकरांचा दोन्ही काँग्रेसवर हल्ला
एअर होस्टेसची हत्या करणाऱ्या आरोपीची पोलीस कोठडीतच आत्महत्या
भूमि पेडणेकरचा फिमेल ऑर्गजमवर भाष्य करणारा थंक्यू फॉर कमिंग; युट्यूबवर सिनेमाच्या ट्रेलरचा 1.6 कोटी व्ह्यूज

‘कन्हैया ट्विटर पे आजा’ या पहिल्या गाण्याची फारशी क्रेझ नाहीये. येत्या काही दिवसात चित्रपटातील दुसरं गाणं प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचा कल समजून येईल. मानुषी चा पहिला चित्रपट ‘पृथ्वीराज चौहान’ दणाणून आपटला. सारा अली खान सोबत ‘ जरा हटके जरा बचके’ चित्रपट केल्यानंतर विकीचं करियरही डगमगलं. दोघांनाही हिट चित्रपटाची अतिशय गरज आहे. चित्रपटाचे गाणी फ्लॉप ठरली तर सिनेमा पाहायला कोणीच जाणार नाही, अशी चर्चा सीनेवर्तुळात रंगली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी