30 C
Mumbai
Thursday, September 14, 2023
घरमनोरंजनविकी आणि मानूशीच्या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च

विकी आणि मानूशीच्या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च

अभिनेता विकी कौशल आणि नवोदित अभिनेत्री मानूषी छिल्लर यांच्या बहूचर्चित ‘द ग्रेट इंडियन फेमिली’चा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित झाला. येत्या २२ सप्टेंबरला शिल्पा शेट्टीच्या सुखी चित्रपटाच्या दिवशीच ‘द ग्रेट इंडियन फेमिली’ चित्रपट प्रदर्शित केला जाईल.
ट्रेलरची सुरुवात बलरामपूर नावाच्या एका छोट्या गावात होते. बलरामपूर गावात भजन कुमार गल्लीबोळ्यात भजनासाठी प्रसिद्ध आहे. वेद व्यास त्रिपाठी ही ओळख काहीशी बाजूला सारत भजन कुमार केवळ पंडित म्हणून प्रसिद्ध प्रसिद्ध होत जातो. तरुण वयात मुली आशीर्वाद घेण्यासाठी त्याचे पाय स्पर्श करतात, याचा भजन कुमारला प्रचंड त्रास होतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yash Raj Films (@yrf)

अचानक एके दिवशी घरात एक निनावी पत्र येते. पत्रात ७ दिसेंबरला तुमच्या घरी जन्मलेला मुलगा मुस्लिम असल्याचं कळवलं जातं. त्यानंतर घरात फुल्ल ड्रामा सुरु होतो. भावनिक हेवेदावे, भांडण यामुळे ट्रेलर कौटुंबिक नात्यावर आधारलेला असल्याचं दर्शवतो.
हे ही वाचा 
‘द ग्रेट इंडियन फेमिली’ चित्रपटात नवोदित अभिनेत्री मानूषी छिल्लरची भूमिका ट्रेलरमध्ये उलगडलेली नाही. ‘द ग्रेट इंडियन फेमिली’ मानूषीचा दुसरा चित्रपट आहे. ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ मध्ये मनोज पाहवा, कुमुद मिश्रा, यशपाल शर्मा, अलका अमीन, सृष्टी दीक्षित, भुवन अरोरा आणि भारती पेरवानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटातील पहिले गाणे, कन्हैया ट्विटर पे आजा काही आठवड्यांपूर्वी रिलीज झाले होते. या गाण्याला नेटीझन्सकडून संमिश्र प्रतिसाद मिळालाय.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी