32 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
HomeमनोरंजनViral Video : साराच्या व्हायरल व्हिडिओने सिनेसृष्टी हादरली!

Viral Video : साराच्या व्हायरल व्हिडिओने सिनेसृष्टी हादरली!

मद्यधुंद अभिनेत्रीने रेस्टॉरंटमध्ये प्रवेश केला आणि गेटवर उभ्या असलेल्या गार्डला विचित्र पद्धतीने स्पर्श केला, असा दावा नेटिझन्सने केला आहे. लोकांचे म्हणणे आहे की, असे जर कोणत्या पुरुषाने केले असते तर त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असता.

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकार नेहमी चर्चेच्या झोक्यात असतात. अशातील एक अभिनेत्री म्हणजे सारा अली खान. विशेष म्हणजे आपल्या मनमोकळ्या आणि मस्तीखोर स्वभावामुळे नेहमी चर्चेत असणारी सारा अली खान यंदा एका वादात सापडण्याची शक्यता आहे. साराचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये साराची कृती पाहून नेटिझन्स आश्चर्यचकित झाले आणि सोशल मीडियावर तिला ट्रोल करत आहेत. मद्यधुंद अभिनेत्रीने रेस्टॉरंटमध्ये प्रवेश केला आणि गेटवर उभ्या असलेल्या गार्डला विचित्र पद्धतीने स्पर्श केला, असा दावा नेटिझन्सने केला आहे. लोकांचे म्हणणे आहे की, असे जर कोणत्या पुरुषाने केले असते तर त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असता. या प्रकरणाची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

खरंतर, बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती अभिनेत्री मद्यधुंद अवस्थेत चालताना दिसत आहे. सारा तिची मैत्रिण शर्मीन सहगलसोबत मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर स्पॉट झाली होती. साराला पाहताच कॅमेऱ्याचा फ्लॅश चमकू लागला. साराला नीट चालता येत नाही आणि तिची मैत्रीण शर्मीन तिला पुन्हा पुन्हा साथ देताना दिसत आहे.

हे सुद्धा वाचा…

MS Dhoni: महेंद्र सिंगने क्रिकेट खेळताना राग कधीही का आला नाही याचे गुपित केले उघड

Viral Video : दारू पिलेल्या प्राध्यापकाचा विद्यापीठात राडा!

Ravikant Varpe : ‘मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात’

काही दिवसांपूर्वीचा सारा अली खानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेत्री शर्मीनसोबत रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करते, त्यानंतर तिथे उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षकाला स्पर्श करत पुढे सरकते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आणि लोकांनी अभिनेत्रीला जोरदार ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका यूजरने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आणि म्हटले की, “लोक विचारतात की बॉलीवूडवर बहिष्कार का टाकला जात आहे, हे कारण आहे. ड्रगवुडमुळे आमची पिढी उद्ध्वस्त होत आहे.”

या व्हिडिओवर लोक संताप व्यक्त करत आहेत. “गरीब सुरक्षा रक्षकाची चूक नाही, जर एखाद्या पुरुषाने महिलेशी असेच केले तर त्याच्यावर विनयभंगाचा आरोप झाला असता”, अशा प्रकारच्या कमेंट्स करत अनेकांनी या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. एवढेच नाही तर रक्षकाच्या समर्थनार्थ वकिली करणारे अनेक लोक पुरुषांना संरक्षण देणारा कायदा हवा, असेही बोलत आहेत. तर दुसरीकडे अनकनजण साराच्या समर्थनार्थ आपले मत मांडताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा प्रकार नैसर्गिक असल्याने साराने केलेले कृत्य निषेधार्थ नाही. तिने कोणतेही गलिच्छ कृत्य केले नसल्याचे स्पष्टीकरणदेखील साराचे चाहते देत आहेत.

एका वृत्तवाहिनीषी बोलताना वकील काशिफ खान सांगतात की, “अशा प्रकरणांमध्ये देशात फक्त महिलांच्या संरक्षणासाठी कायदा आहे. विनयभंगाची तक्रार पुरुषाकडून महिलेविरुद्ध दाखल करता येत नाही, कारण कायद्यात विनयभंग हा शब्द महिलांच्या सुरक्षेसाठी आहे.” त्यानंतर या व्हिडिओचा दाखला देत काशिफ खान यांनी पुरुषांसाठीही विनयभंगाप्रमाणे एखादा विशेष कायदा भारताता लागू व्हावा अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे साराचा बहा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेतील अंधार समोर आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी