28 C
Mumbai
Friday, September 2, 2022
घरमनोरंजनVirushka Scooter Ride : अनुष्का शर्मा आणि विराटची कोहलीची 'स्कूटर राईड'ला पसंती

Virushka Scooter Ride : अनुष्का शर्मा आणि विराटची कोहलीची ‘स्कूटर राईड’ला पसंती

सोशल मीडियावर कायम अॅक्टिव असणारी ही विरुष्का जोडी नेहमी आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. दरम्यान, अनुष्का शर्मा सध्या क्रिकेटर झुलन गोस्वामीच्या जीवनावर आधारित तिच्या आगामी 'चकडा एक्सप्रेस' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून प्रोसिट रॉय दिग्दर्शित हा चित्रपट पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

सेलिब्रिटींविषयी कोणतीही गोष्ट समोर आली की अगदी चर्चेचा विषय बनतो. सेलिब्रिटी त्यांच्या वयक्तिक आयुष्यात कसे वावरतात, कसे जगतात हे पाहणे सर्वसामान्यांसाठी नेहमीच औत्सुक्याचे असते. अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांची ‘स्कुटर राईड’ सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. या विरुष्काच्या जोडीचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे, त्यामुळे त्यांची ही स्कुटर राईड चाहत्यांसाठी आता खमंग चर्चेचा विषय ठरली आहे. शनिवारी दोघे घराबाहेर पडले परंतु त्यांनी कार ऐवजी स्कूटर वरून जाणे पसंत केले. डोक्यावर काळे, मोठे हेल्मेट असल्याने ते बऱ्याच जणांना ओळखू सुद्धा आले नाहीत, त्यामुळे मनसोक्तपणे त्यांनी या राईडचा आनंद घेता आला.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये ते दोघे स्कूटरवरून जात असल्याचे दिसत आहेत. दोघांनी डोक्यावर हेल्मेट घातल्यामुळे त्यांना सहजपणे ओळखणे जवळपास अशक्यच आहे. यावेळी विराट कोहली काळी पॅंट आणि त्यावर साजेसा हिरवा शर्ट या पेहरावात तो कूल दिसत आहे, तर अनुष्काने घातलेल्या काळ्या रंगाच्या पेअरमध्ये ती आणखी खुलून दिसत आहे. त्या दोघांनी पांढऱ्या रंगाचे स्निकर्स आणि हेल्मेट घालून ट्विनिंग केले आहे.

हे सुद्धा वाचा…

Eknath Shinde : सरकार कधी पडणार, एकनाथ शिंदे यांनी दिले स्पष्ट उत्तर

Mumbai Terror Attack : मुंबई 26/11 सारखी उडवून देण्याची धमकी, एकास अटक

भारताचा आणखी एक क्रिकेटपटू निवृत्ती घेणार

सोशल मीडियावर कायम अॅक्टिव असणारी ही विरुष्का जोडी नेहमी आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. दरम्यान, अनुष्का शर्मा सध्या क्रिकेटर झुलन गोस्वामीच्या जीवनावर आधारित तिच्या आगामी ‘चकडा एक्सप्रेस’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून प्रोसिट रॉय दिग्दर्शित हा चित्रपट पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी