22 C
Mumbai
Monday, December 9, 2024
Homeमनोरंजनइटलीमध्ये ‘वॉर 2’ ची शूटिंग सुरू, हृतिक-कियाराचा डान्स व्हिडिओ लीक 

इटलीमध्ये ‘वॉर 2’ ची शूटिंग सुरू, हृतिक-कियाराचा डान्स व्हिडिओ लीक 

फायटरनंतर आता हृतिक लवकरच ‘वॉर 2’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री कियारा अडवाणीही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. (war 2 shooting hrithik roshan kiara advani dance on italy)

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आपल्या डांस आणि आपल्या फिटनेससाठी चर्चेत असतो. त्यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. ॲक्शन चित्रपटातून तो लोकांचे मनोरंजन करत आहे. फायटरनंतर आता हृतिक लवकरच ‘वॉर 2’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री कियारा अडवाणीही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. (war 2 shooting hrithik roshan kiara advani dance on italy)

‘पुष्पा 2’ ची नवीन रिलीज डेट जाहीर, या दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित

अयान मुखर्जी दिग्दर्शित वॉर 2 साठी हृतिक आणि कियारा इटलीमध्ये शूटिंग करत आहेत. या चित्रपटात तिचा एक रोमँटिक सीक्वेन्सही आहे. स्टार्सचे हे शूटिंग करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सेटवरील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झाले आहेत. (war 2 shooting hrithik roshan kiara advani dance on italy)

‘खतरों के खिलाडी 14’ ग्रँड फिनालेमध्ये होणार आलिया भट्टची एंट्री

हृतिक रोशनच्या फॅन पेजवर वॉर 2 च्या शूटिंगचे फोटो व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये हृतिक आणि कियारा इटलीच्या रस्त्यांवर या गाण्यासाठी रोमँटिक सीन शूट करताना दिसत आहेत. हृतिकने ग्रे शर्ट आणि डेनिम्ससह पांढरा टी-शर्ट घातला होता, तर कियारा चेक केलेल्या गुलाबी ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. दोघांमधील केमिस्ट्री पाहून चाहते आधीच वॉर 2 साठी उत्सुक आहेत. (war 2 shooting hrithik roshan kiara advani dance on italy)

व्हिडिओ पाहिल्यानंतर कियारा आणि हृतिकच्या जोडीसाठी चाहते खूश आहेत. चाहत्यांनीही हृतिकच्या फिटनेसचे आणि कियाराच्या क्यूट लूकचे कौतुक केले आहे. दोघेही डान्स आणि रोमान्स करताना दिसत आहेत. (war 2 shooting hrithik roshan kiara advani dance on italy)

सोमवारी हृतिकने इंस्टाग्रामवर एका सुंदर लोकेशनचा फोटो शेअर केला. येथे चित्रपटाची शूटिंग सुरू आहे. फोटोमध्ये तो इटलीच्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद लुटताना दिसत आहे. हृतिकने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “इटली वॉर 2 मधील चित्र.” (war 2 shooting hrithik roshan kiara advani dance on italy)

वॉर हा चित्रपट 2019 ला रिलीज  झाला होता. आता या ॲक्शन थ्रिलर चित्रपटाचा सिक्वेलची शूटिंग सुरु आहे. यात हृतिक रोशन, टायगर श्रॉफ आणि वाणी कपूर मुख्य भूमिकेत होते. वॉर या चित्रपटाने 2019 मध्ये रिलीज झाल्यापासून सात दिवसांत 200 कोटी रुपयांची कमाई केली होती. हा त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. (war 2 shooting hrithik roshan kiara advani dance on italy)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी