26 C
Mumbai
Sunday, March 19, 2023
घरमनोरंजनसिनेमा सिक्वेलपेक्षा सीझनचा बोलबाला

सिनेमा सिक्वेलपेक्षा सीझनचा बोलबाला

ओटीटीमुळे सिनेमापेक्षा प्रेक्षकांचा कल हा वेब सिरीजकडे जास्त वळल्यामुळे सिनेमा सिक्वेलपेक्षा प्रेक्षक वेब सिरिजच्या सीझनची जास्त आतुरतेने वाट पाहताना दिसून येतात.

कोरोना काळात ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आणि प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. ओटीटीवर रिलीज होणाऱ्या सिनेमांची आणि वेबसीरिजची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करीत असतात. ओटीटीमुळे अनेक कलाकारांना ओळख मिळाली. तसेच हे कलाकार लोकप्रिय देखील झाले आहेत. या कलाकारांच्या यादीत अनेक लहान आणि मोठ्या कलाकारांचा समावेश आहे. विशेषतः सिनेमाच्या मुख्य प्रवाहात फारसं काम मिळत नसलेल्या मुकलावंतांना वेबविश्वानं हात दिला आणि त्यातून ओटीटी स्टार ही संकल्पना उदयाला आली. त्यातच सीरिझचा बोलबाला पाहून बॉलिवूड कलावंतांनीही ओटीटीवर पदार्पण केलं. आगामी काळात अनेक वेबसीरिजचे नवे सीझन येत आहेत. त्याचप्रमाणे ओटीटीवर नायिकाप्रधान सीरिजचा ट्रेंड यंदाही कायम राहणार आहे. ओटीटीमुळे सिनेमापेक्षा प्रेक्षकांचा कल हा वेब सिरीजकडे जास्त वळल्यामुळे सिनेमा सिक्वेलपेक्षा प्रेक्षक वेब सिरिजच्या सीझनची जास्त आतुरतेने वाट पाहताना दिसून येतात. (Web series season dominates film sequel)

सीरिजविश्वानं अनेक नायिकांना त्यांची ओळख मिळवून दिली. आज शेफाली डा, शोभिता धुलिपाला, अदिती दनकर यांचा चाहतावर्ग आहे. राधिका आपटेनंही ‘वेब क्वीन’ किताब मिळवला. दिल्ली क्राइम या सीरिजनं शेफालीची अभिनयक्षमता दाखवून, या सीरिजचा दुसरा सीझनही गाजला. निर्माते आता तिसऱ्या सीझनमध्ये दिल्ली आणि सभोवतालच्या गुन्हेगारीविश्वाचे पैलू दाखवण्यासाठी सज्ज झाल्याची चर्चा आहे. शेफालीची भूमिका असलेल्या ‘ह्यूमन’ या सिरिजचेही प्रेक्षकांनी स्वागत केले. या सीरिजचा दुसरा सीझनही लवकरच चाहत्यांसामोर येत आहे.

जुही चावला, सोहा अली खान, कृतिका कामरा, चैतन्या चौधरी यांच्या भूमिका असलेली हश हश ही सीरिज गेल्या वर्षी गाजली. एका पार्टीत भेटलेल्या चार महिला आणि त्यांच्या आयुष्यातली गुपितं आणि खरेखोटेपणा यावर बेतलेल्या या सीरिजचं दिग्दर्शन तनुजा चंद्रानं केलं. महिलाप्रधान सिनेमे देणाऱ्या तनुजानं या सीरिजमध्येही केलेली महिलांच्या भावविश्वाची मांडणी दाद मिळवून गेली. या सीरिजच्या पुढच्या सीझनबद्दल उत्सुकता आहे. कोणतीही भूमिका द्या आणि तिच्या अभिनयाचं खणखणीत नाणं वाजवून घ्या, असं अभिनेत्री शोभिता धुलिपालाबद्दल बोललं जातं.

मेड इन हेवन या सीरिजमध्ये तिने साकारलेल्या तारा या भूमिकेनंही ते दाखवून दिलं. लग्न, नातेसंबंध आणि भावभावना यावर भाष्य करणाऱ्या या सीरिजचा पुढचा सीझनही चर्चेत आहे. वेडिंग प्लॅनर्स आणि त्यांचे अनुभव असा सीरिजचा विषय असला, तरी परंपरा आणि आधुनिकता यातला अंतर दाखवणाऱ्या या सीरिजच्या आगामी भागांत काय दिसणार याची उत्सुकता आहे.

हे सुद्धा वाचा : स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार विकी कौशल

PHOTO नेहा महाजनचा गॉर्जियस लुक; गडद अंधार चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘गांधी गोडसे:एक युद्ध’ चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषींना धमक्या; मुंबई पोलिसांना लिहिलं पत्र

गुन्हेगारी जगतावर बेतलेल्या शी या सीरिजनं आदिती पोहनकरला आव्हानात्मक भूमिकेतून समोर आणलं. यात आदितीनं महिला पोलिस अधिकाऱ्याची भूमिका शिताफीनं साकारली. या सीरिजचा दुसरा सीझनही चर्चेत होता. बॉम्बे बेगम्स आणि द फेम गेम या सीरिजचे पुढचे सीझनही या वर्षात चाहत्यांसमोर येतील असं कळतंय. यासर्व सिरीज नायिकाप्रधान असल्याने यंदाही सीरिजविश्वात नायिकाच वरचढ असणार यात तीळमात्र शंका नाही. आता कोणती अभिनेत्री भाव खाऊन जाते, हे येणारा काळचं ठरवेल.

वास्तविकपणे, नेटफ्लिक्स (Netflix), अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ (Amazon Prime Video), डिजनी प्लस होस्टार (Disney+ hotstar), झी5 (zee5) अशा अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मवर नव्या सीरिजची मालिका चालू असल्यामुळे सिनेमापेक्षा वेबसीजचाच बोलबाला असल्याचे चित्र आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी