25 C
Mumbai
Saturday, November 19, 2022
घरमनोरंजनYou Must Die : भयचक्राचा गूढ अनुभव देणार नाटक ‘ यू मस्ट...

You Must Die : भयचक्राचा गूढ अनुभव देणार नाटक ‘ यू मस्ट डाय ’; विजय केंकरे आणि नीरज शिरवईकर पुन्हा एकत्र

प्रवेश आणि वरदा क्रिशन्स निर्मित 'यू मस्ट डाय' या नाटकाचा शुभारंभ 12 नोव्हेंबरला होणार आहे. नाटकाची निर्मिती अदिती राव यांनी केली आहे.

नाटकं ही वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव देतात. हा अनुभव आनंद देणारा असतो, समाधान देणारा असतो किंवा कधी अस्वस्थ करणाराही असू शकतो. नाट्यक्षेत्रातील मात्तबर जाणकारांसोबत युवा लेखक आणि दिग्दर्शकांची फळी काही नवं करू पाहते आहे. यात लेखक दिग्दर्शक नीरज शिरवईकर हे नाव आघाडीवर आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या साथीने ‘अ परफेक्ट मर्डर’ च्या खेळात प्रेक्षकांना गुंतविल्यानंतर आता पुन्हा ही जोडी ‘यू मस्ट डाय’ हे नवीन सस्पेन्स थ्रिलऱ नाटकं घेऊन प्रेक्षकांना भयचक्राचा गूढ अनुभव द्यायला सज्ज झाले आहेत. या नाटकाचे लेखन नीरज शिरवईकर तर दिग्दर्शन विजय केंकरे यांचे आहे. प्रवेश आणि वरदा क्रिशन्स निर्मित ‘यू मस्ट डाय’ या नाटकाचा शुभारंभ 12 नोव्हेंबरला होणार आहे. नाटकाची निर्मिती अदिती राव यांनी केली आहे.

जिेथे पारदर्शकता असते तिथेच काही गुपीतंही दडलेली असतात. अशाच एका रहस्याची, त्या रहस्यामागे असणा-या व्यक्तीचा मागोवा घेताना निर्माण होणारे गूढ ‘यू मस्ट डाय’ या नाटकात पहायला मिळणार आहे. रहस्याची उकल होते न होते, असं वाटत असतानाच दुसरं रहस्य पुढं येऊन उभं ठाकतं. एक वेगळा खेळ इथे रंगतो. यामागे नक्की काय वास्तव आहे? याची खिळवून ठेवणारी मनोरंजक कथा या नाटकात पहायला मिळणार आहे शर्वरी लोहकरे, सौरभ गोखले, संदेश जाधव, नेहा कुलकर्णी, अजिंक्य भोसले, हर्षल म्हामुणकर, प्रमोद कदम, विनिता दाते, धनेश पोतदार ही कलाकार मंडळी यात असणार आहेत.

हे सुद्धा वाचा

Sharad Pawar Health Update : शेर इज बॅक! राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना मिळाला डिस्चार्ज

Alia-Ranbir Welcome Baby Girl : रणबीर-आलियाला झाले कन्यारत्न

Andheri East Bypoll Election : निवडणुकीत विजयी होताच ऋतुजा लटकेंचा भाजपला टोला

या नाटकाचे लेखन आणि नेपथ्य नीरज शिरवईकर यांनी केले आहे. नाटकाचे संगीत अशोक पत्की यांचे असून प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची आहे. वेशभूषा मंगल केंकरे तर रंगभूषा राजेश परब यांची आहे. या नाटकाला दिग्दर्शन सहाय्यक सुशील स्वामी व धनेश पोतदार असून सूत्रधार संतोष शिदम आहेत.

आपण जे पाहतोय त्यामागील खरं कारण काय आहे हे उलगडू न देणं हे खूप मोठं आव्हान सस्पेन्स थ्रिलर प्रकारा मध्ये असतं. थरार, उत्कंठा, शोध, संशय, समज-गैरसमज या सगळ्या नजरबंदीच्या खेळातून गूढतेचा अनुभव देणारं ‘यू मस्ट डाय’ हे नाटक प्रेक्षकांना नक्की खिळवून ठेवेल यात शंका नाही.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!