31 C
Mumbai
Tuesday, March 26, 2024
Homeसिनेमातुमचे लाडके जान्हवी-श्री परत येताहेत!

तुमचे लाडके जान्हवी-श्री परत येताहेत!

एकेकाळी झी मराठी (ZEE Marathi) वर अनेक मालिका लोकप्रिय होत्या. जुन्या लोकप्रिय मालिकांच्यावेळी अनेक शो टीआरपी चार्टमध्ये शीर्षस्थानी असायचे. मात्र अलीकडे झी मराठीचा टीआरपी लक्षणीयरीत्या घसरला आहे. या चॅनलवर फक्त एकच मालिका टॉप 10 टीआरपी यादीत दिसते. त्यामुळे वाहिनीकडून नवा फंडा वापरला जात असल्याची चर्चा आहे. झी मराठीवर पुन्हा एकदा दोन जुन्या मालिका सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. (Zee Marathi: Janhvi-Shri are coming back)

झी मराठीने अलीकडेच दोन जुन्या मालिका नव्याने सुरू करण्यात येण्याची घोषणा केली. या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. ज्या वेळी या मालिका ऑन एअर चालू होत्या, त्या वेळी त्यांच्या चर्चेच्या विषयांमुळे त्या लोकप्रियतेच्या शिखरावर होत्या. ‘होणार सून मी या घरची’ (Honaar Soon Mee Hyaa Gharchi) आणि ‘का रे दुरावा’ (Ka Re Durava) या मालिका प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहेत. या मालिकांमधील अनेक कलाकार आजही त्यांच्या पात्रांच्या नावाने देखील ओळखले जातात.

१३ फेब्रुवारीपासून ‘होणार सून मी ह्या घरची’ आणि ‘का रे दुरावा’ या मालिका पुन्हा एकदा सुरू होत आहे. जय-आदितीची मालिका संध्याकाळी ४ वाजता तर जान्हवी-श्रीची मालिका संध्याकाळी ५ वाजता झी मराठीवर पाहता येईल. या मालिका सुरू होत असल्याने आणखीही काही जुन्या मालिका सुरू होतील, अशी अपेक्षा प्रेक्षकांना आहे. झी मराठीने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टवरील कमेंट्सनुसार जुळून येती रेशीमगाठी, जय मल्हार, दिल दोस्ती दुनियादारी, आभाळमाया, एका लग्नाची दुसरी गोष्ट, उंच माझा झोका या मालिकाही पुन्हा सुरू कराव्यात अशी मागणी प्रेक्षकवर्गातून करण्यात येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

हे सुद्धा वाचा : सिनेमा सिक्वेलपेक्षा सीझनचा बोलबाला

‘पठाण’ला देशविदेशातून तुफान प्रतिसाद; शाहरुखच्या चाहत्यांनी थिएटर्स डोक्यावर घेतली

स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार विकी कौशल

प्रेक्षकांच्या अशाही कमेंट्स आल्या आहेत की, ‘नव्या मालिका चालत नसल्याने जुन्या मालिका सुरू केल्या जात आहेत’. त्यामुळे आता झी मराठी टप्प्याटप्प्याने जुन्या मालिका सुरू करणार का आणि या नव्या प्रयोगाला किती प्रतिसाद मिळेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी