29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमुंबईमुंबईची तुंबई होण्यापूर्वी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी घेतला मिठी नदीचा आढावा

मुंबईची तुंबई होण्यापूर्वी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी घेतला मिठी नदीचा आढावा

टीम लय भारी

मुंबई : यंदा महाराष्ट्रात मान्सून लवकर हजेरी लावणार असल्याचे चिन्ह हवामान खात्याने वर्तवले आहेत. याच पाश्वभूमीवर मिठी नदीच्या पुनरुज्जीवनासंदर्भात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आमदार दिलीप लाडें आणि सदा सरवणकर, एमएमआरडीए आयुक्त श्रीनिवास जी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू जी व अफरोज शाह जी यांच्यासमवेत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी (Environment Minister Aditya Thackeray) आढावा घेतला.(Environment Minister Aditya Thackeray surveyed Mithi river)

राज्यात आणि केंद्रात युतीचं सरकार आल्यानंतर मिठी नदीबाबत महत्वाची पाऊलं उचलल्याचं युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. तिच्या प्रदुषणमुक्तीसाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या याची माहिती दिली. येत्या दोन वर्षात मिठीवरील उर्वरित कामं पूर्ण केली जाणार आहेत. यापुढे मिठीला पूर येणार नाही असा विश्वास आदित्य यांनी (Environment Minister Aditya Thackeray) व्यक्त केला.

मेट्रोच्या विशेषत: पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा आढावा घेण्यात आला. टनेलिंगची कामे, पूरनियंत्रण, पंपिंग स्टेशन, आदी बाबींचा ठाकरे यांनी आढावा घेतला. पश्चिम द्रुतगती महामार्गावर करावयाच्या सायकल ट्रॅकचा आढावा घेण्यात आला. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शहरात सायकल वापरास चालना देण्यास पर्यावरणपूरक आणि साहाय्यभूत ठरेल, असे ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) यांनी सांगितले. मिठी नदीची स्वच्छता आणि नदीकिनाऱ्याचे सुशोभीकरण याबाबतही माहिती घेण्यात आली. मुंबई शहरातून वाहणारी ही नदी प्रदूषणमुक्त करण्याबरोबरच तिचे सुशोभीकरण करण्यावर भर देण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.

हे सुद्धा वाचा :- 

Maharashtra minister Aditya Thackeray to visit Ayodhya in first week of May

महागाईवर काहीतरी बोला अन्यथा पुढचा काळ कठीण आमदार  जितेंद्र आव्हाड यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी