34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
HomeनोकरीESIC Recruitment : ईएसआयसीमध्ये 3600 पदांची जम्बो भरती, दहावी ते पदवीधर उमेदवारांसाठी...

ESIC Recruitment : ईएसआयसीमध्ये 3600 पदांची जम्बो भरती, दहावी ते पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

टीम लय भारी

नवी दिल्ली : कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) मध्ये 10 वी आणि12 वी पास आणि पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळवण्याची संधी आहे. ईएसआयसीमध्ये (ESIC Recruitment) 3600 पदांवर भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. ईएसआयीसीच्या विविध पदांसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर केला जाणार आहे. 3600 पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 15 जानेवारीपासून सुरु होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी 2022 आहे(ESIC Recruitment: 3600 posts in ESIC).

कोणत्या पदांसाठी भरती?

कर्मचारी राज्य विमा निगममध्ये वरिष्ठ विभागीय क्लार्क, अप्पर डिव्हिजनल क्लार्क , स्टेनोग्राफर, मल्टी टास्किंग स्टाफ यासह इतर पदांसाठी भरती केली जाणार आहे.

रविवारी 24 तासांचा मेगा ब्लॉक, ठाणे-दिवा मार्गावरील वाहतुकीवर होणार परिणाम,लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द

१ जानेवारीपासून तुमच्या खिशाला बसणार फटका; जाणून घ्या काय बदल होणार आहेत

पदांची संख्या

कर्मचारी राज्य विमा निगममध्ये एकूण 3600 पदांसाठी भरती केली जाणार आहे. वरिष्ठ विभागीय क्लार्क, अप्पर डिव्हिजनल क्लार्क, मल्टी टास्किंग स्टाफ या पदांसाठी भरती होणार आहे. अधिकृत जाहिरात आणि पदांची संख्या यासाठी esic.nic.in या वेबसाईटवर भेट देणे आवश्यक आहे.

अर्ज कोण करु शकतं?

कर्मचारी राज्य विमा निगमने जारी केलेल्या अधिकृत जाहिरातीनुसार स्टेनोग्राफर पदासाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवाराकडे 12 उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असलं पाहिजे. तर वरिष्ठ विभागीय क्लार्क, अप्पर डिव्हिजनल क्लार्क, स्टेनोग्राफर या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार पदवीधर असणं आवश्यक आहे. यासोबत त्यांना संगणक वापरण्याचे ज्ञान असणं आवश्यक आहे. एमटीएस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर वर्तमानपत्रे शेअर करणाऱ्यांना उच्च न्यायालयाचा दणका; ग्रुप बंद करण्याचे दिले आदेश!

ESIC Recruitment 2022: Apply for 3847 UDC, MTS, Steno Posts from January 15 on esic.nic.in

वयोमर्यादा

कर्मचारी राज्य विमा निगममध्ये वरिष्ठ विभागीय क्लार्क, अप्पर डिव्हिजनल क्लार्क, स्टेनोग्राफर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे तर कमाल 27 वर्ष असावे. आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांना शासकीय नियमाप्रमाणं वयोमर्यादेमध्ये सूट दिली जाणार आहे.

वेतन

अप्पर डिव्हिजनल क्लार्क पदावर निवड होणाऱ्या उमेदवाराला 25 हजार 500 ते 81 हजार 110 रुपये वेतन सातव्या वेतन आयोगानुसार दिलं जाणार आहे. तर स्टेनोग्राफर पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला 18 हजारे ते 56 हजार 900 रुपये वेतन दिलं जाईल. एससी, एसटी आणि दिव्यांग, महिला उमेदवारांसाठी 250 रुपये फी निश्चित करण्यात आली आहे. तर, इतर प्रवर्गातील उमदेवारांसाठी 500 रुपये शुल्क निश्चित करण्यात आलंय.

अर्ज दाखल कसा करायचा?

स्टेप 1 : सर्वप्रथम ईएसआयसीची वेबसाईट esic.nic.in ला भेट द्या.
स्टेप 2: मोबाईल नंबर, ईमेल आयडी नोंदवून अर्जातील माहिती भरा
स्टेप 3 : अर्जातील माहिती जतन करुन पुढील बटनावर क्लिक करा
स्टेप 4 : अर्जाचं शुल्क जमा करा.
स्टेप 5 : कागदपत्रं स्कॅन करुन अपलोड करा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी