30 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
HomeमुंबईExclusive : राष्ट्रवादी काँग्रेसचीही भाजपसोबत जाण्याची तयारी

Exclusive : राष्ट्रवादी काँग्रेसचीही भाजपसोबत जाण्याची तयारी

टीम लय भारी

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला सुरूंग लावलेला आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसलाही भाजपसोबत जायचे आहे. तसा आग्रहच अनेक आमदारांनी धरला असल्याची खात्रीलायक माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘लय भारी’ला दिली.

शरद पवार व सुप्रिया सुळे यांचा मात्र भाजपसोबत जायला कडाडून विरोध आहे. अन्य प्रमुख नेते मात्र भाजपसोबत जाण्यासाठी उत्सुक आहेत. विशेषत: अजित पवारांना भाजपसोबत जाण्यामध्ये फार इच्छा आहे. बहुतांश आमदार सुद्धा भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही आहेत.

एवढेच नव्हे तर, भाजप व राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या याबाबत बैठकाही झाल्या आहेत. शिंदे गटाला सोबत घ्यायचे की, राष्ट्रवादीला सोबत घ्यायचे असे दोन्ही पर्याय सध्या भाजपकडे असल्याचे सूत्रांनी ‘लय भारी’ला सांगितले. सरकारमध्ये आपला सहभाग राहिला नाही तर, निवडणुका जिंकणेही कठीण होईल. मतदारसंघातील कामे करता येणार नाहीत. त्यामुळे भाजपसोबत चला, असा आग्रह राष्ट्रवादीच्या आमदारांनी धरला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा :

मध्यावधी निवडणुकांची काॅंग्रेसला भरली ‘धडकी‘ ; राष्ट्रवादी काॅंग्रेसची ‘नो कमेंटस‘

शिवसेनेत सतत कारस्थाने करणाऱ्या शंभूराज देसाईंना पक्षाची नोटीस

नितीन देशमुख म्हणाले, गुजरात पोलिसांनी मला हात – पाय धरून गाडीत कोंबले, एकनाथ शिंदेंनी फसविले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी