28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रशिवसेना नेत्याच्या नावाने तरूणीने केली आत्महत्येची फेसबुक पोस्ट, चित्रा वाघ आक्रमक !

शिवसेना नेत्याच्या नावाने तरूणीने केली आत्महत्येची फेसबुक पोस्ट, चित्रा वाघ आक्रमक !

टीम लय भारी

 

पुण्यातील डेक्कन परिसरातील एका हॉटेलमध्ये फेसबुक लाईव्ह करत एका तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती शनिवारी 12 मार्च रोजी समोर आली. या फेसबुक पोस्टमधून अत्याचारास जबाबदार असणाऱ्या आरोपीवर कारवाई करण्याची मागणी तिने केली. या फेसबुक पोस्ट संदर्भात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडीओमधून शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर आक्रमक होऊन घणाघात केलाआहे. हे नेते या पीडित मुलीवर दबाव आणत असल्याचे आरोप चित्रा वाघ यांनी केले आहेत.

काय म्हणाल्या चित्रा वाघ ?

शिवसेनाचा नेता रघुनाथ कुचिक ज्याला राज्यमंत्री दर्जाही  दिला आहे. अशा नराधमाने हरामखोर बलात्कार केला आणि तिचा जबरदस्तीने गर्भपात केला ज्याबद्दल तिने समोर येऊन या सर्व गोष्टी सांगितल्या.एवढ्या गोष्टी आणि पुरावे असताना त्याला कशी काय बेल मिळते, मला माहित नाही. दोनदा बेल मिळाली तो बाहेर आहे आणि त्या मुलीवरती सतत प्रेशर करतोय ही केस मागे घे म्हणून सतत मॅसेज करतोय,हे मॅसेज कोणाला दाखवायचे आहेत त्यांना दाखव मला काही फरक पडत नाही, अशा पद्धतीची त्याची भूमिका शिवसेना नेत्याची आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

…तर या घटनेची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची असेल

या सर्व प्रकरणामागे त्याचा कर्ता-करविता-बोलविता धनी कोण आहे हे कळले पहिजे.  या संदर्भामधली त्या मुलीने एक फेसबुक पोस्ट टाकली. त्यात तिने लिहिले आहे की, मी स्वत:ला संपवतेय. त्यामुळे तिने जर तिच्या जीवाचं जर काही बरं वाईट केलं आणि त्यात ती मुलगी मेली तर त्याची सर्व जबाबदारी रघुनाथ कुचिकसह पुण्याचे पोलिस आणि या राज्य सरकारची देखील असेल, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

पुण्यातल्या सर्व यंत्रणा झोपल्यात का ?

तिने केलेल्या सर्व पोस्ट मी पुण्याच्या सीपींना,जॉईन सीपींना आणि गृहमंत्र्यांना पाठवल्या कित्येक फोनदेखील केले मात्र एकानेही फोन उचलला नाही. मॅसेज पाहूनसुद्धा रिप्लाय दिला नाही .मला एवढंच कळकळून सांगायचं आहे की, वाचवा तिला वाचवा.ती मेल्यानंतर तुम्ही आंदोलन कराल मोर्चे कराल काळ्या फीती लावून फिराल मेणबत्त्या करुन फिराल त्याला काही अर्थ नाही. जिवंत मुलगी आहे तिला वाचवा.हात जोडून विनंती करते मी. कुठे गेले सर्व कमिशन, झोपलेत का?,असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.

तुमच्या लेखी महिलांची इज्जत काय आहे, हे महाराष्ट्राने पाहिलंय…

आता जर तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर ही सर्व जबाबदारी ही राज्य सरकारची असणार आहे. महिला धोरण हे सर्व ठकोसले बंद करा जिवंत हाडामासाची मुलगी त्याठिकाणी येते तिला न्याय देण्याचं काम जर तुम्ही करु शकत नसाल तर तुम्हाला तिथं बसण्याचा काही अधिकार नाही. लक्षात ठेवा पुण्याचे कमिशनर साहेब कित्येक फोन मी तुम्हाला केले. त्यामुळे तुमच्या लेखी महिलांची इज्जत काय आहे, हे महाराष्ट्राने पाहिलंय. ती मेल्यानंतर सर्वजण एक होतील परंतु जिवंत मुलीला न्याय देण्याचा प्रयत्न तुम्ही करणार नाही हेच या महाराष्ट्राचं दु:ख आहे. हे सर्व मी अतिशय व्यथित होऊन मी बोलतेय, असे वक्तव्य भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केले.

हीची पूजा चव्हाण होऊ देऊ नका..

कुठे गेलीये ती मुलगी कि यानेच तिला गायब केली याचा ही तपास करा. हीची पूजा चव्हाण होऊ देऊ नका मुख्यमंत्री महोदयआत्महत्येला प्रवृत्त करणार्या कुचिकवर तात्काळ ३०७ चा गुन्हा दाखल करा..तिच्या मरणाची वाट बघू नका त्याआधी वाचवा तिला, असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी