31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeक्राईमपुन्हा घात! नाशकात शिवसेना पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला

पुन्हा घात! नाशकात शिवसेना पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला

टीम लय भारी 

नाशिक : राज्यातील सत्तेसाठी शिवसेना वि. शिवसेना एकमेकांसोबत भिडली असून वरचस्व सिद्ध करण्यासाठी प्रत्यकचजण आपापल्या परीने प्रयत्न करू लागला आहे. या प्रयत्नांत शिवसैनिकांवर जीवघेणे भ्याड हल्ले सुरू झाले असून अशा घटना वारंवार घडू लागल्या आहेत. नाशिकमध्ये काल शिवसेना पदाधिकाऱ्यावर रात्रीच्या वेळी अज्ञात हल्लेखोराने हल्ला केला असून यात पदाधिकारी गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

वारंवार शिवसेना पदाधिकाऱ्यांवर होणाऱ्या या हल्ल्यामुळे राज्यातील वातावरण आणखी तापणार असे दिसू लागले आहे. नाशिक विधानसभा प्रमुख निलेश उर्फ बाळा कोकणे काल (दि. 18 जुलै) रात्रीच्या वेळी दुचाकीवरून एमजीरोडवरून जात असताना अचानक अज्ञात हल्लेखोरांनी कोकणे यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला.

एमजी रोडवरील यशवंत व्यायामशाळा परिसरात झालेल्या या हल्यात हल्लेखोरांनी बाळा कोकणे यांच्या डोक्यावर व पाठीवर धारदार शस्राने वार केले, कोकणे यात गंभीर जखमी झाले. या घटनेबाबत कळताच तात्काळ त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणाला गांभीर्याने घेत भद्रकाली पोलीस कसून तपास करीत आहेत. दरम्यान या हल्ल्यामागील कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. हल्ला करताच हल्लेखोरांनी लगेचच तेथून पलायन केले.

हा हल्ला कोणी आणि कशासाठी केला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, त्यामुळे सेनेतील पडलेले दोन गट, अंतर्गत वादावादी असे अनेक गोष्टी लक्षात घेत याप्रकरणी शोध घेण्यात येत आहे.

शिवसेना पदाधिकाऱ्यावर झालेला हा पहिला हल्ला नाही. या आधी सुद्धा मुंबईच्या एका पदाधिकाऱ्यावर हल्ला झाला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबत स्वतः तिथे जाऊन चौकशी केली होती, त्यावेळी असे भ्याड हल्ले खपवून घेतले जाणार नाही असा इशारा सुद्धा दिला होता. परंतु या इशाऱ्याला न जुमानता पुन्हा शिवसेना पदाधिकाऱ्यांना लक्ष करून त्यांच्यावर हल्ले करीत हल्लेखोर शिवसेनेला खुले आव्हान देत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर शिवसेना काय अॅक्शन घेणार, हल्लेखोर शोधून काढणार का, आपल्या सैनिकांच्या सुरक्षिततेसाठी काय उपाय करणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा…

राजीनामा की हकालपट्टी?

एसटी बस दुर्घटना अपडेट, 12 जणांवर शोकाकूल वातावरणात आज होणार अंत्यसंस्कार

VIDEO : सामान्यांना संकटात टाकण्याचा नवा डावपेच

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी