28.9 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Home40 दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजेंनी धर्मनिष्ठा सोडली नाही..!
Array

40 दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजेंनी धर्मनिष्ठा सोडली नाही..!

श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते |
यदं कसेविनी लेखा वतर्ते कस्यनोपरि ||

छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतः लिहिलेल्या या राजमुद्रेचा अर्थ असा की, शिवपुत्र श्री शंभु राजे यांची राजमुद्रा सूर्याच्या तेजाप्रमाणे आकाशी शोभते. लोकांच्या कल्याणाकरिता तिचा अंमल सर्वत्र गाजणारा आहे. त्यासाठी ही मुद्रा सदैव प्रकाशमान आहे! छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र संभाजी राजे महाराज यांचा आज स्मृतिदिन आहे. शेर शिवा का छावा, धर्मवीर, धर्माभिमानी, व्यासंगी, शूरवीर आणि विविध भाषांवर प्रभुत्व असणारे संस्कृत पंडित अशी अनेक बिरुदे देऊनही ज्यांची कीर्ती वर्णन करताना शब्द अपुरे पडतील, अशा छत्रपती संभाजी महाराजांना मनाचा मुजरा..!

40 दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजेंनी धर्मनिष्ठा सोडली नाही..!

लहानपणापासूनच मोहिमा आणि राजकारणांच्या डावपेचांचे बाळकडू मिळालेल्या छत्रपती संभाजी महाराजांनी (Chhatrapati Sambhaji Maharaj) शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याचे समर्थ आणि खंबीरपणे रक्षण केले. रणांगणात शत्रूला झुंजवण्यापासून, स्वराज्याचा विस्तार करण्यापर्यंत त्यांचा मोलाचा वाटा आहे. संभाजी महाराजांनी अगदी गोव्यातील पोर्तुगीजालाही वठणीवर आणले होते. एखाद्या वादळाप्रमाणे शत्रूवर चाल करण्याची त्यांची पद्धत एकमेकाद्वितीय होती. समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणारे संभाजी महाराज स्वकीयांच्याच फितुरीमुळे गनिमीच्या तावडीत सापडले होते. आजच्याच दिवशी अर्थात फाल्गुन अमावास्येला छत्रपती संभाजी महाराजांची प्राणज्योत मालवली होती.

किल्ले पुरंदर येथे 14 मे, इसवी सन 1657 रोजी छत्रपती संभाजीराजेंचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव सईबाई होते. संभाजी राजे केवळ 2 वर्षांचे असताना सईबाईंचा मृत्यू झाला होता. पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ नावाची महिला त्यांची दूध आई बनली आणि जिजाऊंनी त्यांचे पालन पोषण केले. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई सोयराबाई यांनी देखील त्यांच्यावर खूप माया केली. शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे सुपुत्र असल्याने रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले होते. असे म्हटले जाते की, संभाजी महाराजांनी तब्बल दीडशेहून अधिक युद्ध लढले असून त्यापैकी एकामध्ये देखील त्यांना शरणागती पत्करावी लागली नाही. यामुळेच संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाने त्यांचे श्रेष्ठत्व सिद्ध होते.

40 दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजेंनी धर्मनिष्ठा सोडली नाही..!

 

अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीवेळी सोबत नेले. त्यावेळी संभाजीराजे फक्त 9 वर्षांचे होते. दरम्यान मुघल सैन्याचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली आणि परिसरात एकच खळबळ उडाली होती. काही काळाने संभाजीराजे सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला होता.

40 दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजेंनी धर्मनिष्ठा सोडली नाही..!
फोटो सौजन्न- गुगल : छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभू राजेंना आग्रा भेटीवेळी सोबत नेले; त्यावेळी ते फक्त 9 वर्षांचे होते

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होईपर्यंत संभाजीराजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना जिंकून घेतले. जिजाबाईंचे निधन झाल्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते. सळसळत्या रक्ताच्या तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकर्‍यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले.

40 दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजेंनी धर्मनिष्ठा सोडली नाही..!
फोटो सौजन्न-गुगल: संभाजी राजेंच्या राज्याभिषेकाचे छायाचित्र

छत्रपती संभाजी महाराज दिसायला राजबिंडे होते. त्यांच्या हजरजबाबी आणि रोखठोक बोलण्यामुळेच त्यांना स्वराज्यातही बरेच शत्रू होते. राजकारणात मुरब्बी असलेल्या संभाजी महाराजांची कीर्ती केवळ छत्रपती म्हणून नव्हती. अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारे छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचे उत्तम जाणकारही होते. छत्रपती संभाजी महाराज हळवे होते. मृदू मनाचे कवीही होते. संभाजी महाराजांनी वयाच्या 14 वर्षी बुधभूषण-राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला. याशिवाय नाईकाभेद, नखशिखा, सातसतक या ग्रथांची निर्मिती देखील केली.

40 दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजेंनी धर्मनिष्ठा सोडली नाही..!
फोटो सौजन्न- गुगल : ​वयाच्या १४ व्या वर्षी ग्रंथलेखन

16 जानेवारी इसवी सन 1681 मध्ये संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी उदार अंतःकरणाने भ्रष्ट अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना माफ केले आणि त्यांना अष्टप्रधान मंडळात पुन्हा स्थान दिले. मात्र, काही काळानंतर अण्णाजी दत्तो आणि सोयराबाईंनी पुन्हा संभाजीराजांविरुद्ध कट केला आणि त्यांना कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करायचा घाट घातला. तेव्हा संभाजीराजांनी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकार्‍यांना हत्तीच्या पायी दिले.

40 दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजेंनी धर्मनिष्ठा सोडली नाही..!

संभाजी महाराज यांनी सुमारे 150 युद्ध लढले असून त्यांना एका युद्धात त्यांना हार पत्करावी लागली नाही. 1689 च्या सुरवातीला संभाजीराजे कोकणातील संगमेश्वर येथून रायगडाकडे रवाना होत असतानाच त्यांचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरवर हल्ला केला. या कारवाईसाठी गणोजी शिर्केने कमालीची गुप्तता बाळगली होती. मराठ्यांत आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी असल्याकारणानेप्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. परिणामी शत्रूने संभाजीराजांना जिवंत पकडले. संभाजीराजे आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादुरगड येथे आणण्यात आले.

40 दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजेंनी धर्मनिष्ठा सोडली नाही..!
फोटो सौजन्न- गुगल: औरंगजेबाने अत्यंत क्रूरपणे हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला

औरंगजेबाने संभाजीराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले. पण संभाजीराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाने संभाजीराजे आणि कवी कलश यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. तरीही संभाजीराजांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला. तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला. सुमारे 40 दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. म्हणून त्यांना अखंड भारतवर्षाने धर्मवीर हे पदवी बहाल केली. क्रूर अत्याचाराने परिसीमा गाठली, तरी संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेरही उमटली नाही. धर्माभिमानी, लढवय्या, शेर का छावा, असामान्य शौर्य गाजवणाऱ्या संभाजी महाराजांची फाल्गुन अमावास्या म्हणजेच, 11 मार्च 1689 रोजी प्राणज्योत मालवली.

हे सुद्धा वाचा : 

संतापजनक : महसूल, आरोग्य विभागाचा नालायकपणा ; शिवाजी महाराजांचा अनमोल ठेवा धुळीत

मोठी बातमी : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव झाले; केंद्र सरकारने दिली मंजुरी !

अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करू नका; संभाजी भिडेंचे वादग्रस्त विधान

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी