32 C
Mumbai
Tuesday, May 16, 2023
घरहिंदू धर्मात गुढीपाडव्याला विशेष महत्त्व; जाणून घ्या 'ही' 3 प्रमुख कारणे

हिंदू धर्मात गुढीपाडव्याला विशेष महत्त्व; जाणून घ्या ‘ही’ 3 प्रमुख कारणे

हिंदू धर्मात गुढीपाडव्याला विशेष महत्त्व आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी महाराष्ट्रीय लोक गुढीपाडव्याचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी गुढीपाडवा उदया अर्थात 22 मार्च 2023 रोजी साजरा केला जाणार आहे. हा सण देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. (Gudhipadva 2023)

या सणाबाबत असे म्हटले जाते की, या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली. म्हणूनच गुढीला ब्रह्मध्वज देखील मानले जाते. 14 वर्षांच्या वनवासानंतर भगवान राम अयोध्येत परतल्याबद्दल काही लोक गुढीपाडव्याचा सण साजरा करतात.
गुढी लावल्याने घरात सुख-समृद्धी येते. रब्बी पीक काढणीनंतर पुन्हा पेरणी झाल्याच्या आनंदात शेतकरी हा सण साजरा करतात.

गुढीपाडवा साजरा करणे खूप महत्वाचे आहे, त्यामागे 3 प्रमुख कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली होती आणि हा दिवस ब्रह्मपूजेसाठी समर्पित मानला जातो. दुसरे कारण म्हणजे या दिवसापासून नवरात्रीची सुरुवात होते आणि प्रत्येक घरात माँ दुर्गा वास करते. तिसरे कारण म्हणजे शेतकरी या दिवशी नवीन पिके घेतात. हिंदू धर्मात गुढीपाडव्याला विशेष स्थान आहे. मान्यतेनुसार या दिवशी घराच्या मुख्य दारावर किंवा बाल्कनीत गुढी उभारल्याने नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाहीत, त्यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते, भाग्याची ओढ चालते.

गुढीपाडव्याची तारीख आणि पूजेची वेळ
चैत्र शुक्लपक्ष प्रतिपदा सुरू होते: रात्री 09.22 पासून (21 मार्च 2023 मंगळवार)
चैत्र शुक्लपक्ष प्रतिपदा संपते: संध्याकाळी 06.50 पासून (22 मार्च 2023 बुधवार)
उदय तिथीनुसार, 22 मार्च 2023 रोजी गुढीपाडवा साजरा केला जाईल.
गुढी पाडवा पूजा मुहूर्त: सकाळी 6.29 ते सकाळी 7.39 (22 मार्च 2023)

देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो ‘गुढीपाडवा’
गोवा आणि केरळमधील कोकणी समुदाय गुढी पाडवा संवत्सर पाडवा म्हणून साजरा करतात. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये गुढीपाडव्याचा सण उगादी म्हणून ओळखला जातो. काश्मिरी हिंदू हा दिवस नवरे म्हणून साजरा करतात. मणिपूरमध्ये या दिवसाला साजिबू नोंगमा पनबा म्हणतात. या दिवसापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते.

हे सुद्धा वाचा :

यंदा आग्रा किल्ल्यात छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर; प्रथमच होणार ‘दिवाण-ए-आम’ मध्ये शिवजयंती उत्सव

‘माता रमाई जयंती उत्सव’ शासकीय पातळीवर साजरा करा; सुप्रिया सुळे यांची एकनाथ शिंदेंकडे मागणी

महाशिवरात्रीनिमित्त देशभरात होणार बम-बम भोलेचा गजर..!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी