29 C
Mumbai
Saturday, May 20, 2023
घरगुढीपाडवा विशेष: वर्षभर चैतन्य मिळवण्यासाठी करा 'या' गोष्टी..!

गुढीपाडवा विशेष: वर्षभर चैतन्य मिळवण्यासाठी करा ‘या’ गोष्टी..!

चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी महाराष्ट्रीय लोक गुढीपाडव्याचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली. म्हणूनच गुढीला ब्रह्मध्वज देखील मानले जाते. 14 वर्षांच्या वनवासानंतर भगवान राम अयोध्येत परतल्याबद्दल काही लोक गुढीपाडव्याचा सण साजरा करतात. गुढी लावल्याने घरात सुख-समृद्धी येते. रब्बी पीक काढणीनंतर पुन्हा पेरणी झाल्याच्या आनंदात शेतकरी हा सण साजरा करतात. (Gudipadwa)

हिंदू सणात विशेष महत्व असणाऱ्या गुढी पाढव्याच्या दिवशी ही काम न विसरता करा. यामुळे भविष्यात तुम्हाला सुख समृद्धी आरोग्य आणि धनलाभ होऊ शकतो.

  • गुढीपाडव्याच्या ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान वगैरे करा. यानंतर सुगंध, फुले, धूप, दिवा इत्यादींनी देवाची पूजा करा.
  • पाटावर पांढर्‍या रंगाचे कापड पसरून त्यावर हळद किंवा कुंकू लावून अष्टकोनी कमळ बनवावे. यानंतर कमळाच्या मध्यभागी ब्रह्मदेवाची मूर्ती ठेवून पूजा करा.
  • गणपतीची आराधना करावी. ‘ओम ब्रह्मणे नमः’ या मंत्राचा 108 वेळा जप करावा. विधीपूर्वक ब्रह्मदेवाची पूजा करावी.
  • गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाच्या पानांची पावडर बनवून त्यात मीठ, हिंग, जिरे, काळी मिरी आणि साखर घालून सेवन करावे. यामुळे आरोग्य वर्षभर चांगले राहते. शारीरिक वेदनाही दूर होतात.
  • चैत्र नवरात्रीची सुरुवातही चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला होते. अनेकजण या दिवशी घटस्थापना करुन उपवास देखील करतात. चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गा मातेची पूजा केल्याने समृद्धी, सुख आणि ऐश्वर्य प्राप्त होते.

गुढीची पूजा
या दिवशी गुढी उभारून तिची पूजा केली जाते. एका उंच बांबूवर चांदी, तांबे किंवा पितळाचा उलटा कलश ठेवला जातो. ज्यामध्ये सुंदर साडीने सजवली जाते. गुढी कडुलिंबाची पाने, आंब्याचे देठ आणि लाल फुलांनी सजवली जाते. गुढी उंच ठिकाणी ठेवली जाते, जेणेकरून ती दूरवरून दिसते. अनेक जण घराच्या मुख्य दरवाजावर किंवा खिडक्यांवर लावतात.

हे सुद्धा वाचा :

हिंदू धर्मात गुढीपाडव्याला विशेष महत्त्व; जाणून घ्या ‘ही’ 3 प्रमुख कारणे

अंनिस अंधश्रद्धा नाही तर हिंदूधर्म मिटवण्याच्या मागे; प्रदीप नाईकांचा खळबळजनक आरोप

40 दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजेंनी धर्मनिष्ठा सोडली नाही..!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी