30 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
Homeहिंदी, मराठी वृत्तवाहिन्यांसमोर नवे संकट; अनेकांना गमवाव्या लागणार नोकऱ्या!
Array

हिंदी, मराठी वृत्तवाहिन्यांसमोर नवे संकट; अनेकांना गमवाव्या लागणार नोकऱ्या!

"मीडिया मार्केट"च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यातच अनेक वृत्तवाहिन्या त्यांच्या संपादकीय आणि इतर कर्मचार्‍यांमध्ये 20 ते 25% कपात करू शकतात. टीव्ही न्यूज चॅनेल्सवर कोरोनानंतरचे हे दुसरे मोठे संकट ठरू शकेल.

हिंदी, मराठी वृत्तवाहिन्यांसमोर नवे संकट आले आहे. त्यामुळे अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागणार, अशी स्थिती दिसत आहे. (Hindi Marathi News Channels In Trouble) चालू आर्थिक वर्षाच्या 11 महिन्यांत (22 एप्रिल ते 23 फेब्रुवारी) जवळपास सर्वच मोठ्या आणि छोट्या चॅनल्सच्या महसुलात म्हणजेच जाहिरातींमध्ये 32-35% ची घट झाली आहे. त्यामुळे वृत्तवाहिन्यांचे आर्थिक गणित बिघडले असून तिथे काम करणाऱ्या लोकांच्या नोकऱ्यांही धोक्यात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

“मीडिया मार्केट”च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यातच अनेक वृत्तवाहिन्या त्यांच्या संपादकीय आणि इतर कर्मचार्‍यांमध्ये 20 ते 25% कपात करू शकतात. टीव्ही न्यूज चॅनेल्सवर कोरोनानंतरचे हे दुसरे मोठे संकट ठरू शकेल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या काळात न्यूज चॅनेल पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती, कारण त्या काळात बहुतांश मनोरंजन कार्यक्रम बंद होते. दिल्ली आणि मुंबईतील स्टुडिओत नवीन मनोरंजनात्मक कार्यक्रमांची निर्मिती ठप्प झाली होती. मात्र, कोविड साथ ओसरल्यानंतर, जनजीवन व मार्केट सामान्य होताच, मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक पुन्हा मनोरंजनाकडे म्हणजे GEC कडे वळले. पर्यायाने, बातम्यांच्या विश्वात प्रेक्षकांची सुमारे 25% हून अधिक घट झाली, ज्याचा थेट परिणाम या वाहिन्यांच्या कमाईवर झाला आहे. कोविडकाळात फेसबुकसह (मेटा) अनेक आयटी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर भरती केली. मात्र, कोविड साथ ओसरताच कर्मचारी कपात सुरू झाली. काहीसे तसेच व्यावसायिक गणिताचा अंदाज चुकल्याने वृत्तवाहिन्यांत होण्याची शक्यता दिसत आहे.

आता बहुतांश वृत्तवाहिन्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीची वाट पाहत आहेत, ज्यातून निवडणूक जाहिरातींचा महसूल मिळविची शक्यता आहे. एकूणच, कोरोनानंतर पुन्हा एकदा न्यूज इंडस्ट्रीसमोर रोजगाराचे नवे संकट उभे ठाकले आहे.

काही जाणकारांच्या मते, टीव्ही चॅनेल्सच्या अतिरंजित, एकांगी, सरकारी पक्षाकडे झुकलेल्या बातम्या यामुळे अनेकांनी विश्वाHindiसार्हता गमाविली आहे. त्यातच पॅरलल सोशल मीडिया अधिक वस्तुनिष्ठ आणि वास्तववादी असल्याने त्याचे तगडे आव्हान सरकारची आरती ओवाळणाऱ्या टीव्ही न्यूज चॅनेल्सपुढे निर्माण झाले आहे. एखाद्या मजबूत विरोधी पक्षाच्या जबाबदारीचे भान मीडियाने गमावल्याने त्यांना फटका बसणे स्वाभाविक आहे. टीव्ही मालिका, वेब सिरीज पाहू; पण बातम्या नको, अशी मानसिकता दर्शकात रुजत आहे.

हे सुध्दा वाचा :

MNS : नोकऱ्या गेल्या, पगार कपात झाली आम्हाला संपर्क साधा!

Google च्या जगभरातील 12,000 कर्मचाऱ्यांवर कुऱ्हाड

मायक्रोसॉफ्टसुद्धा 10,000 कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या तयारीत

याशिवाय, जाहिरातदारांकडे प्रेक्षकसंख्येचे अचूकरित्या आकलन करणारे अनेक टेक्निकल टूल्स आता उपलब्ध झाले आहेत, त्यामुळे टीआरपीच्या खोट्या आणि भ्रमित करणाऱ्या आकड्यांना जाहिरातदार बळी पडत नाही. टीआरपी स्कॅमचा तपास सरकारे बदलण्याच्या राजकीय भानगडीत गुंडाळून ठेवला गेला असला तरी टीआरपी हा प्रिंट मीडियातील एबीसीसारखाच झोल असल्याचे एव्हाना सर्वश्रुत झाले आहे. वृत्तवाहिन्यांवरील जाहिरातींची परिणामकारकता व त्यावरून मिळणारा प्रतिसादही कमी होत चालला आहे. या सर्वांचा फटका या उद्योगाला बसत आहे. विशेषत प्रेक्षकांचा विश्वास गमावणे, प्रेक्षकांशी बांधिलकी न उरणे आणि सत्तेशी समर्पण त्यातच प्रेक्षकांच्या हाती आलेला सोशल मीडियाचा सशक्त पर्याय यामुळे वृत्तवाहिन्यांचीही मृत्यूघंटा वाजू लागलेली आहे.

Hindi Marathi News Channels In Trouble, हिंदी मराठी वृत्तवाहिन्यांसमोर नवे संकट, अनेकांना गमवाव्या लागणार नोकऱ्या, Advertising Revenue Decreasing, Media Job Cuts Fear

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी