30 C
Mumbai
Wednesday, May 10, 2023
घरIAS डॉ. सना गुलवानी : पाकिस्तानातील पहिली महिला हिंदू आयएएस अधिकारी; भारतीयांना...

IAS डॉ. सना गुलवानी : पाकिस्तानातील पहिली महिला हिंदू आयएएस अधिकारी; भारतीयांना अभिमान, सिंधी समाजासाठी गौरवास्पद!

पाकिस्तानातून तमाम भारतीयांसाठी एक अभिमानाची बातमी आली आहे. पाकिस्तानातील पहिली महिला हिंदू आयपीएस अधिकारी म्हणून डॉ. सना गुलवानी यांनी पदभार स्वीकारला आहे. काहींच्या मते, त्या केवळ हिंदूच नव्हे तर या पदावर जाणाऱ्या पाकिस्तानच्या इतिहासातील पहिल्याच पाकिस्तानी महिला आहेत.

पाकिस्तानातून तमाम भारतीयांसाठी एक अभिमानाची बातमी आली आहे. पाकिस्तानातील पहिली महिला हिंदू आयएएस अधिकारी म्हणून डॉ. सना गुलवानी (IAS Dr Sana Gulwani) यांनी पदभार स्वीकारला आहे. काहींच्या मते, त्या केवळ हिंदूच नव्हे तर या पदावर जाणाऱ्या पाकिस्तानच्या इतिहासातील पहिल्याच पाकिस्तानी महिला आहेत. तमाम भारतीयांबरोबरच पाकिस्तान आपली कर्मभूमी मानून तिथे देशासाठी योगदान देणाऱ्या सिंधी समाजासाठीही ही अतिशय गौरवास्पद बाब मानली जात आहे.

आपल्याकडे भारतीय प्रशासकीय सेवा आणि पोलिस सेवा म्हणजेच आयएएस आणि आयपीएस वैगेरे सरकारी सेवा असतात, त्याच धर्तीवर पाकिस्तानात सेंट्रल सुपीरियर सर्व्हिसेस (सीएसएस) आणि पाकिस्तान प्रशासकीय सेवा (पीएएस) असतात. पीएएस म्हणजे आपल्याकडील आयएएस अधिकारी पद होय. यूपीएससीच्या धर्तीवर तिकडे सीएसएस परिक्षा होतात.

डॉ. सना रामचंद गुलवानी या 27 वर्षीय हिंदू तरुणी आहेत. पाकिस्तानची पहिली हिंदू महिला नागरी सेवक बनण्याचा मान त्यांनी पटकावला आहे. डॉक्टर सना आता पंजाब प्रांतातील हसनअब्दल शहरातील असिस्टंट कमिशनर (सहाय्यक आयुक्त) आणि प्रशासक आहेत. या शहराच्या इतिहासातही प्रथमच या पदावर एखादी महिला अधिकारी कार्यभार स्वीकारत आहे.

हसनअब्दल शहराच्या सहाय्यक आयुक्त आणि प्रशासक डॉ. सना गुलवानी (फोटो क्रेडिट : दैनिक भास्कर/ गुगल)
हसनअब्दल शहराच्या सहाय्यक आयुक्त आणि प्रशासक डॉ. सना गुलवानी (फोटो क्रेडिट : दैनिक भास्कर/ गुगल)

डॉ. सना गुलवानी या पाकिस्तानातील सेंट्रल सुपीरियर सर्व्हिसेस (CSS) परीक्षा 2020 उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर त्या पाकिस्तान प्रशासकीय सेवेत (PAS) रुजू झाल्या आहेत. डॉ. गुलवानी यांनी पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण केली. एक्सप्रेस ट्रिब्यून वृत्तपत्राला हिंदू समाजातील कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फाळणीनंतर ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या डॉ. गुलवानी या पहिल्याच पाकिस्तानी महिला आहेत. डॉन या पाकिस्तानी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, डॉ. सना यांनी अटॉक जिल्ह्यातील हसनअब्दल शहराच्या सहाय्यक आयुक्त आणि प्रशासक म्हणून पदभार स्वीकारला आहे.

हे सुद्धा वाचा : 

VIDEO : रेणुका ठाकूरने मारलेल्या ‘त्या’ निशाण्यावर पाकिस्तानी खेळाडू घायाळ

Karan Johar : करण जोहर बघतोय पाकिस्तानी सिनेमे! फोटो तुफान व्हायरल

भाजपाला मोठा धक्का; उल्हासनगरमध्ये ओमी कलानी गटाच्या २२ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

डॉ. सना या सिंध प्रांतातील शिकारपूर शहरात लहानाच्या मोठ्या झाल्या. फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये नावनोंदणी करण्यापूर्वी तिच्या पालकांच्या इच्छेनुसार त्या आधी डॉक्टर बनल्या. डॉ. सना गुलवानी यांनी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सांगितले होते, “या सेवेत जाणारी मी पाकिस्तानच्या इतिहासातील पहिलीच महिला आहे की नाही, हे मला माहित नाही, परंतु माझ्या भारतीय समुदायातील कोणी महिला या परीक्षेलासुद्धा बसल्याचे माझ्या ऐकिवात नाही.”

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी