32 C
Mumbai
Wednesday, December 6, 2023
घरओमिक्रॉन बीएफ 7 : चीनमध्ये कहर माजवणाऱ्या कोरोना व्हेरीएंटचे भारतात चार रुग्ण;...

ओमिक्रॉन बीएफ 7 : चीनमध्ये कहर माजवणाऱ्या कोरोना व्हेरीएंटचे भारतात चार रुग्ण; जुलैतच गुजरातमध्ये आढळले होते पहिले प्रकरण; सरकारला जाग आली निवडणुका आटोपल्यांनतरच!! 

तमाम भारतीयांसाठी चिंताजनक आणि धडकी भरविणारी ही बातमी आहे. चीनमध्ये कहर माजवणाऱ्या कोरोना व्हेरीएंटचे भारतात चार रुग्ण आढळले आहेत. ओमिक्रॉन बीएफ 7 असा हा व्हेरीएंट आहे. खरेतर हा ओमिक्रॉन सबव्हेरीएंट आहे. अर्थात, जुलैतच गुजरातमध्ये बीएफ 7चे  पहिले प्रकरण आढळले होते. तेव्हा झोपून राहिलेले सरकार आता निवडणुका आटोपताच जागे झाले असून पुन्हा मास्कसक्ती, निर्बंधाची भाषा सुरू केली गेली आहे. अमेरिका, ब्रिटन, बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स आणि डेन्मार्क सारख्या युरोपियन देशांसह जगातील अनेक देशांमध्ये कोविड विषाणूच्या नव्या घातक सबव्हेरीएंटचे रुग्ण याआधीच आढळले आहेत. भारतात हे रुग्ण चार महिने आधी सापडूनही उशिरा जाग्या झालेल्या सरकारच्या बेपर्वाईचा फटका आता नाहक नागरिकांना भोगावा लागणार की काय, अशी स्थिती आहे. 

तमाम भारतीयांसाठी चिंताजनक आणि धडकी भरविणारी ही बातमी आहे. चीनमध्ये कहर माजवणाऱ्या कोरोना व्हेरीएंटचे भारतात चार रुग्ण आढळले आहेत. ओमिक्रॉन बीएफ 7 असा हा व्हेरीएंट आहे. (Omicron Subvariant BF7) खरेतर हा ओमिक्रॉन सबव्हेरीएंट आहे. अर्थात, जुलैतच गुजरातमध्ये बीएफ 7चे  पहिले प्रकरण आढळले होते. तेव्हा झोपून राहिलेले सरकार आता निवडणुका आटोपताच जागे झाले असून पुन्हा मास्कसक्ती, निर्बंधाची भाषा सुरू केली गेली आहे.

ओमिक्रॉन सबव्हेरीएंट बीएफ 7 चे भारतात 4 रुग्ण आढळून आले आहेत. याच कोरोनाच्या उपप्रकाराने सध्या चीनमध्ये मृत्यूचे तांडव उभे केल्याचे सांगितले जात आहे. नेहमीप्रमाणे चीन मृत्यूचे आकडे दडवत असल्याची जगाला शंका आहे. केवळ भारतच नव्हे तर जगभरात चीनमधील भयंकर स्थितीने टेन्शन वाढविले आहे. भारतातील चार रुग्णात तीन गुजरातमध्ये तर एक ओडिशात आढळला आहे.

गुजरात आरोग्य विभागाच्या बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरने बीएफ 7 चे रुग्ण सापडल्याची पुष्टी केली आहे. या वर्षीच्या सुरुवातीपासूनच चीनमध्ये ओमिक्रॉनच्या बीएफ 7 व बीएफ 12 या प्रकारच्या रुग्णांची प्रकरणे समोर येत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, भारतातही जुलैमध्येच या प्रकारांची लागण झालेल्या दोन रुग्णांची प्रकरणे समोर आली होती. गुजरातमध्येच हे रुग्ण आढळले होते. जुलै ते नोव्हेंबर दरम्यान त्यांच्यावर होम आयसोलेशनमध्येच उपचार केले गेले होते. एनडीटीव्हीने या खळबळजनक सत्याचा भांडाफोड केला आहे. जुलैमध्ये गुजरात राज्यात सापडलेल्या बीएफ 7 व बीएफ 12 बाधित रुग्णांच्या प्रकरणाची वाच्यताच होऊ दिली गेली नाही. या संपूर्ण काळात गुजरातमध्ये सभा, रॅली, निवडणूक प्रचारात प्रचंड गर्दी उसळत होती. राज्य व केंद्र सरकारनेही चीनमध्ये निरंतर गंभीर स्थिती असताना ओमिक्रॉनच्या नव्या खतरनाक सबव्हेरीएंटची भारतातील प्रकरणे जणू दडवूनच ठेवली. या बाधित रुग्णांवर उपचार सुरू असताना गुजरात निवडणूक धामधुमीत पार पडली. आता निवडणुका आटोपताच एकाएकी सरकारला परिस्थिती फार गंभीर असल्याचा साक्षात्कार झाला आहे.

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, जुलै-नोव्हेंबर या काळात ओमिक्रॉनच्या बीएफ 7 व बीएफ 12 या प्रकारांची लागण झालेल्या दोन्ही रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार करण्यात आले. दोघेही आता पूर्णपणे बरे झाल्याचे गुजरात आरोग्य विभागातर्फे सांगितले जात आहे. जुलैमध्ये या सबव्हेरीएंटचा पहिला रुग्ण समोर येऊनही काही पावले उचलली गेली नाही. त्यानंतर गुजरातेत 2 रुग्ण आढळले होते. आता मात्र सरकारला एकाएकी परिस्थिती फारच गंभीर झाल्याचे वाटू लागलेय. जुलैमध्ये पहिला बीएफ 7 रुग्ण सापडताच घ्यावयाची बैठक गुजरात विधानसभा निवडणूक आटोपल्यानंतर 4 महिन्यांनी बुधवारी घेण्यात आली. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली ही कोविड आढावा बैठक घेतली गेली. या बैठकीत तज्ञांनी सांगितले, की आतापर्यंत कोविड प्रकरणांमध्ये एकूण वाढ झालेली नाही. मात्र, तरी आणखी काही रुग्णांच्या नमुन्यांचा मागोवा घेण्यासाठी सतत पाळत ठेवणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा : 

धक्कादायक : कोविडमुळे म्हातारा होतोय मानवी मेंदू; याशिवाय होताहेत गंभीर परिणाम

ऑस्ट्रेलियाच्या दोन तृतीयांश लोकसंख्येला कोविडचा फटका! भारतातही धोका कायम

VIDEO : चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक; संपूर्ण जग पुन्हा एकदा हायअलर्टवर

चीनमधील विविध शहरे सध्या ओमिक्रॉनच्या संसर्गाने ग्रस्त झालेली असल्याचे रिपोर्ट्स येत आहेत. मुख्यतः कोविडचा बीएफ 7 प्रकार अत्यंत संसर्गजन्य आहे. सध्या याच सबव्हेरीएंटने बीजिंगमध्ये धुमाकूळ माजवला आहे. चीनमध्ये कोविड संसर्गाच्या प्रकरणांमध्ये एकाएकी मोठी वाढ नोंदविली जात आहे. ओमिक्रॉनचा बीएफ 7 हा  बीए 5 चाच एक उपप्रकार आहे. मात्र, हा प्रकार अधिक संक्रामक आहे. यात इनक्युबेशन कालावधी कमी असतो. शिवाय, या प्रकारात लसीकरण झालेल्या लोकांनाही पुन्हा संसर्ग करण्याची क्षमता असते. अमेरिका, ब्रिटन, बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स आणि डेन्मार्क सारख्या युरोपियन देशांसह जगातील अनेक देशांमध्ये कोविड विषाणूच्या नव्या घातक सबव्हेरीएंटचे रुग्ण याआधीच आढळले आहेत. भारतात हे रुग्ण चार महिने आधी सापडूनही उशिरा जाग्या झालेल्या सरकारच्या बेपर्वाईचा फटका आता नाहक नागरिकांना भोगावा लागणार की काय, अशी स्थिती आहे.

Omicron Subvariant BF7, BF7 in India, Mask in India Again, ओमिक्रॉन बीएफ 7, LockDown Again, कोविड साथ

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी