30 C
Mumbai
Wednesday, August 3, 2022
घरThackeray vs Shinde : ठाकरे शिंदे गटाचे भवितव्य उद्या

Thackeray vs Shinde : ठाकरे शिंदे गटाचे भवितव्य उद्या

एकनाथ शिंदे सरकारची न्यायालयात लढाई सुरू आहे. आजच्या सुनावणीमध्ये अंतिम तोडगा निघालेला नाही. न्यायालयाने सुनावाणी उद्यावर ढकलली आहे.

राज्यातील ठाकरे विरुद्ध शिंदे गट हा सत्ता संघर्षाचा पेच आज संपेल असे सर्वांना वाटले होते. मात्र आजही सर्वांचा अपेक्षाभंग झाला. उद्या सकाळी १०.३० वाजता या विषयावर सुनावणी होणार आहे. उद्या तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. त्यामुळे या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा देशात निर्माण झालेला सर्वांत मोठा सत्तापेच आहे. जगातल्या कोणत्याही देशात नाही असे सरकार आपल्याकडे आहे. केवळ दोन जणांचे मंत्रीमंडळ राज्य कारभार करत आहे. त्यामुळे राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. राज्याला तब्बल एक महिन्यानंतर देखील मंत्रीमंडळ नाही.

त्यामुळे राज्यात अनेक समस्यांना तोंड फुटले आहे. याचा राज्यातील जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. आज झालेल्या सुनावणीमध्ये शिंदेंचा गट मूळ शिवसेनेवर दावा करु शकत नाही असा युक्तीवाद शिवसेनेच्या वतीने कप‍िल सिब्बल यांनी केला. शिवाय शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर फूट मान्य केली आहे. त्यामुळे पक्षांतर बंदी कायदयानुसार विल‍िनीकरण हाच एक मार्ग आहे. शिंदे गट जो दावा करत आहे. आम्ही म्हणजे शिवसेना आहोत. तर त्यांना नवीन पक्ष काढावा लागू शकतो. त्यांना भाजपमध्ये विलीन व्हावे लागू शकते. जर ते भाजपमध्ये विलीन झाले तर मग आम्ही बाळासाहेबांच्या विचारधारेवर चालतो. हा त्यांचा दावा देखील फोल ठरेल.

हे सुद्धा वाचा 

Deepak Kesarkar : संत दीपक केसरकर ठाणे हृदयसम्राट एकनाथ शिंदेंना भेटले

Phulandevi : सामान्य महिला असलेल्या फुलनदेवीवर डाकू होण्याची वेळ का आली ?

Rohit Sharma : विराट कोहलीने गमविले, ते रोहित शर्मा परत मिळवणार

कदाचित शिंदे गटाला नवीन पक्ष तयार करावा लागू शकतो. शिंदे गटाला आपण मूळ पक्ष असल्याचे निवडणूक आयोगा समोर सिध्द करावं लागेल. उदया १६ आमदारांच्या निलंबनाचा प्रश्न देखील मार्गी लागू शकतो. राज्यपालांची भूमिका काय असायला हवी यावर कोर्टात उदया युक्तीवाद होण्याची शक्यता आहे. जा एका पक्षाचे सरकार केंद्रात असेल आणि दुसऱ्या पक्षाचे सरकार राज्यात असेल तर राज्यापालांच्या अधिकारांचा गैरवापर होऊ शकतो. शिंदे गट हा स्वतंत्र राहिला आहे. हा सत्तापेचाच तिढा अजून काही दिवस राहू शकतो. कारण हा घटनात्मक पेच प्रसंग आहे. त्यामुळे कदाचित ५ किंवा त्याहून अधिक न्यायमूर्तीच्या खंडपीठाकडे हे प्रकरण जाईल त्यानंतरच न्याय निवाडा होण्याची शक्यता आहे.

त्याला किती काळ लागेल. हे यावेळी कोणीही ठाम पणे सांगू शकत नाही. १ आठवडयाच्या आता असे घटनापीठ तयार झाले, तर याचा लवकर उलगडा होऊ शकतो. या प्रसंगामुळे लोकशाहिचे नुकसान होत आहे. शिंदे गटाला पक्ष सोडायचा असेल तर राजीनामा दयावा लागेल.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!