31 C
Mumbai
Saturday, March 18, 2023
घरवंदे भारत एक्सप्रेस का आहे खास, ते जाणून घ्या...

वंदे भारत एक्सप्रेस का आहे खास, ते जाणून घ्या…

वंदे भारत 2.0 अधिक अत्याधुनिकतेने सुसज्ज आहे. ही गाडी केवळ 52 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेग वाढवू शकते. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचा कमाल वेग ताशी 180 किलोमीटर पर्यंत पोहोचतो. तुम्ही एकदा वंदे भारत मधून प्रवास केलात, की तुम्हाला इतर ट्रेनमधून प्रवासच करावासा वाटणार नाही. वंदे भारतमधील प्रवास अगदी विमानातील प्रवासासारखाच राहणार आहे.

राज्यात मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर या दोन नव्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावणार आहेत. त्यामुळे वंदे भारत गाड्यांबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. वंदे भारत एक्सप्रेस का आहे खास, ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Vande Bharat Express Is Special) मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस आणि मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसमध्ये तुम्ही एकदा प्रवास केलात, की तुम्हाला इतर ट्रेनमधून प्रवासच करावासा वाटणार नाही. वंदे भारतमधील प्रवास अगदी विमानातील प्रवासासारखाच राहणार आहे.

वंदे भारत एक्सप्रेस 2.0 ही अधिक गतीचा अनुभव तर देतेच शिवाय, अनेक उत्कृष्ट अनुभूतीही मिळेल. तुमचा प्रवास आनंदाचा, सुखकर आणि आरामदायी होईल. ही रेल्वेगाडी प्रगत अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे, यात रेल्वे गाड्यांची धडक टाळण्यासाठीची स्वदेशी विकसित ट्रेन कोलिजन अव्हॉइडन्स सिस्टीम – कवच समाविष्ट आहे.

वंदे भारत 2.0 अधिक अत्याधुनिकतेने सुसज्ज आहे. ही गाडी केवळ 52 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेग वाढवू शकते. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचा कमाल वेग ताशी 180 किलोमीटर पर्यंत पोहोचतो. या रेल्वेगाडीत अनेक सुधारित वैशिष्ट्ये आहेत. वंदे भारत एक्‍सप्रेसचे वजन 430 टन होते. ते कमी करून आता सुधारित 392 टन आहे, ज्यामुळे गाडी अधिक वेगाने धावू शकते. या ट्रेनमध्ये वाय-फाय कंटेंट ऑन-डिमांड सुविधाही उपलब्ध आहे.

वंदे भारत रेल्वेगाडीच्या आधील आवृत्‍तीत असलेल्या 24 इंच रुंदीच्या स्‍क्रीनच्‍या तुलनेत प्रत्‍येक डब्यामध्ये 32 इंच रुंदीचे स्‍क्रीन आहेत, ज्याद्वारे प्रवाशांना माहिती आणि मनोरंजन उपलब्ध होते. या गाडीतील वातानुकूलन 15 टक्के अधिक ऊर्जा कार्यक्षम असल्यामुळे वंदे भारत एक्सप्रेस पर्यावरणस्नेही देखील ठरत आहे. ट्रॅक्शन मोटरच्या माध्यमातून धूळ-मुक्त स्वच्छ हवा वातानुकूलनासह या रेल्वेगाडीतील प्रवास अधिक आरामदायी होणार आहे. आरामदायी आसनांची म्हणजेच साइड रिक्लायनर सीटची सुविधा जी पूर्वी फक्त एक्झिक्युटिव्ह श्रेणीतील प्रवाशांना दिली जात होती ती आता सर्व श्रेणीसाठी उपलब्ध करून दिली जाईल. एक्झिक्युटिव्ह डब्यामध्ये 180-अंशात फिरणाऱ्या आसनांचे अतिरिक्त वैशिष्ट्य आहे.


अशी असते वंदे भारत ट्रेन – शानदार आणि जानदार!

वंदे भारत एक्सप्रेसच्या नवीन डिझाईनमध्ये, हवा शुद्धीकरणासाठी असलेल्या रूफ-माउंटेड पॅकेज युनिटमध्ये (आरएमपीयु) फोटो-कॅटॅलीस्ट अल्ट्राव्हायोलेट वायु शुद्धीकरण प्रणाली स्थापित करण्यात आली आहे. चंदीगढच्या केंद्रीय वैज्ञानिक उपकरणे संस्थेने केलेल्या शिफारसीनुसार, ताजी हवा आणि परतीच्या हवेतून येणारे जंतू, जीवाणू, विषाणू इत्यादींपासून मुक्त हवा गाळून स्वच्छ करण्यासाठी डिझाईन केलेली प्रणाली आरएमपीयूच्या दोन्ही टोकांवर स्थापित करण्यात आली आहे.

वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या वेगाबाबत सांगायच तर ही ट्रेन मुंबई ते पुणे प्रवास अवघ्या 2 तासात पूर्ण करेल. सध्या या प्रवासाला 4 तास लागतात. म्हणजे 2 तासांच्या वेळेची, निम्म्या वेळेची बचत होऊ शकेल.

हे सुद्धा वाचा :

मुंबई शिर्डी प्रवास होणार वेगवान अन् आरामदायी; राज्यात दोन नव्या वंदे भारत एक्सप्रेस

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे रुपडे पालटणार; कसे असेल नवे अत्याधुनिक कॉम्प्लेक्स, काय होणार बदल?

मुख्यमंत्री म्हणाले, फलाटावर उभे राहिलो की आपण लोकलच्या आत आपोआप जातो

Vande Bharat Express Is Special, Mumbai Shirdi Vande Bharat Train, वंदे भारत एक्सप्रेस का आहे खास, मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस, Mumbai Solapur Vande Bharat Train

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी