29 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeजगातील कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वात भारी आहे, माहितीये का?
Array

जगातील कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वात भारी आहे, माहितीये का?

'वर्ल्डस् मोस्ट पॉवरफुल पासपोर्टस् 'वाल्या देशांची यादी जाणून घ्या ... भारताचा नंबर या यादीत कितवा असेल? जगभरातील प्रवाशांच्या नजरेतून भारताची रॅंकिंग सुधारलीय की घसरलीय? जगातील कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वात बेकार आहे ? जाणून घ्या 'जगातील सर्वात प्रभावी पासपोर्टस्'वाल्या देशांचे रॅंकिंग...

जगातील कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वात भारी आहे, माहितीये का तुम्हाला? ‘वर्ल्डस् मोस्ट पॉवरफुल पासपोर्टस्’वाल्या देशांची यादी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. भारताचा नंबर या यादीत कितवा असेल असे तुम्हाला वाटते? जगभरातील प्रवाशांच्या नजरेतून भारताची रॅंकिंग सुधारलीय की घसरलीय, तेही आपण जाणून घेऊया…

हेनले पासपोर्ट इंडेक्स ही जगभरातील देशांच्या पासपोर्टचे मूल्यांकन करणारी क्रमवारी यादी आहे. लंडनमधील हेनले अँड पार्टनर्स या संस्थेकडून दरवर्षी ही क्रमवारी यादी जाहीर केली जाते. ही संस्था जगभरातील प्रवासी, फ्रिक्वेंट ट्रॅव्हलर्स, एनआरआय यांच्यासाठी ग्लोबल सिटीझनशिप आणि रेसिडेन्सी सल्लागार म्हणून काम करते. या संस्थेने 2023 या वर्षासाठीची ‘जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टस्’वाल्या देशांची रॅंकिंगही नुकतीच जाहीर केली आहे. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना (आयएटीए) कडून दिल्या गेलेल्या डेटाच्या आधारे ही क्रमवारी यादी जाहीर केली जाते.

‘जगातील सर्वात प्रभावी पासपोर्टस्’वाल्या देशांच्या रॅंकिंगमध्ये 199 देश आणि 227 पर्यटनस्थळांचा समावेश आहे. पर्यटन, भ्रमंती आणि जागतिक संपर्काच्या दृष्टीने दिली जाणारी विश्वासार्ह माहिती; तसेच त्यातील सहजता या आधारावर ही पासपोर्ट रॅंकिंग केली जाते. या यादीत 193 गुणांसह जपान पहिल्या स्थानी आहे. म्हणजेच जगात जपानचा पासपोर्ट सर्वात पॉवरफुल आहे. दुसऱ्या स्थानी 192 गुणांसह सिंगापूर आणि दक्षिण कोरिया आहेत. जर्मनी आणि स्पेन हे 190 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहेत.

वर्ल्डस् मोस्ट पॉवरफुल पासपोर्टस् 2023
  1. जपान – 193
  2. सिंगापूर, दक्षिण कोरिया – 192
  3. जर्मनी, स्पेन – 190
  4. फिनलँड, इटली, लक्झमबर्ग – 189
  5. ऑस्ट्रिया, डेन्मार्क, नेदरलँड्स, स्वीडन – 188
  6. फ्रान्स, आयर्लंड, पोर्तुगाल, ब्रिटन -187
  7. बेल्जियम, झेक प्रजासत्ताक, न्यूझीलंड, नॉर्वे, स्वित्झर्लंड, अमेरिका – 186
  8. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ग्रीस, माल्टा – 185
  9. पोलंड, हंगेरी – 184
  10. लिथुआनिया, स्लोव्हाकिया – 183
भारताच्या पासपोर्टचे स्थान काय?

जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टस् यादीत भारत 85 व्या स्थानावर आहे. यासह, भारतात जगभरातील 59 देशांना व्हिसा-मुक्त प्रवेश दिला जातो. यापूर्वी 2019 आणि 2020 मध्ये भारत अनुक्रमे 82 व 84 व्या स्थानावर होता. गेल्यावर्षी
या यादीत भारत 83 व्या स्थानी होता.

जगातील सर्वात कुचकामी पासपोर्ट

102. उत्तर कोरिया
103. नेपाळ, पॅलेस्टिनी प्रदेश
104. सोमालिया
105. येमेन
106. पाकिस्तान
107. सीरिया
108. इराक
109. अफगाणिस्तान
Worlds Most Powerful Passports, वर्ल्डस् मोस्ट पॉवरफुल पासपोर्टस्, India Passport Rank, जगातील कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वात भारी, IATA

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी