34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रबारामतीच्या आजोबा अन् नातवाला राजकारणासाठी अहिल्यादेवींचा साक्षात्कार झालाय : गोपीचंद पडळकर

बारामतीच्या आजोबा अन् नातवाला राजकारणासाठी अहिल्यादेवींचा साक्षात्कार झालाय : गोपीचंद पडळकर

टीम लय भारी 

अहमदनगर : पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी ३१ मे रोजी सकाळी ९ वाजता चोंडी याठिकाणी नागरिकांनी या सोहळ्याला मोठ्या संख्याने उपस्थितीत राहावे, असं आवाहन केलं आहे. अहल्यादेवी होळकर यांच्या जयंती महोत्सवा निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली. यावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) यांनी  पुन्हा एकदा पवार कुटुंबावर जोरदार टीका केली आहे. gopichand padalkar criticize pawar family

आमदार गोपीचंद पडळकर हे  काल अहमदनगर जिल्हाच्या दौऱ्यावर होते. त्यांनी असे म्हटले, मागच्या 70 वर्षांत महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना कधीही अहल्यादेवी दिसल्या नाहीत. मात्र आता बारामतीतील आजोबा आणि नातवाला भविष्यातील राजकारणासाठी अहिल्यादेवींचा साक्षात्कार झाला आहे. अठरा पगड जातीत विखुरलेली राज्यातील जनता जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना थारा देणार नाही, असंही पडळकरांनी स्पष्ट केलं आहे.

अहिल्यादेवींनी मंदिरांच्या जीर्णोधार करुन हिंदू समाज रक्षणाचे काम केले. त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त देशभर ऊर्जेचे वातावरण आहे. कौटुंबिक दु:खाच्या प्रसंगातही समाजासाठी अत्यंत धिरोदात्तपणे लढलेल्या राजमाता अहल्यादेवीमुळे अनेक महिलांना समाजासाठी काम करण्याची जिद्द निर्माण झाली. आमदार मोनिका राजळेही त्याच पावलावर पाऊल ठेवून मतदार संघात काम करत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

अहिल्यादेवी होळकर जयंती सोहळा मुंबईत दणक्यात होणार, गणेश हाके यांचा पुढाकार (जाहीरात)

बारामतीच्या आजोबा अन् नातवाला राजकारणासाठी अहिल्यादेवींचा साक्षात्कार झालाय : गोपीचंद पडळकर

सुद्धा वाचा:

खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही , उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आश्वासन

Nepal Plane With 22 On Board, Including 4 Indians, Missing

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी