29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeराजकीयसत्तेचा माज असणारे प्रस्थापित वंचित घटकांपर्यंत त्यांचे हक्क पोहचू देत नाहीत :...

सत्तेचा माज असणारे प्रस्थापित वंचित घटकांपर्यंत त्यांचे हक्क पोहचू देत नाहीत : गोपीचंद पडळकर

टीम लय भारी :

मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 131 वी जयंती आहे. या जयंतीनिमित्त मानवंदना देताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी प्रस्थापितांना टोला लगावलाय. यावेळी आपला न्याय हक्काचा संघर्ष सुरूच ठेवावा लागेल तीच खरी बाबासाहेबांना मानवंदना असेल, असे गोपिचंद पडळकर म्हणाले. सत्तेचा माज असणारे प्रस्थापित आमचे हक्क आमच्या पर्यंत पोहचवू देत नाहीत, असेही पडळकर म्हणाले. (Gopichand Padalkar’s criticized mahavikas aghadi)

आजचा दिवस या देशातील दुर्बल वंचिताना प्रेरणा देणारा आहे.. कारण आज परमपुज्य विश्वरत्न भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे.डॉ.बाबासाहेबांनी वंचित घटकांना न्याय मिळाला पाहिजे, प्रस्थापितांकडून होणारे त्यांचे शोषण थांबले पाहिजे. यासाठी भारतीय संविधानात तशी तजविज केली. पण आजही सत्तेचा माज असणारे प्रस्थापित आमचे हक्क आमच्या पर्यंत पोहचू देत नाहीत. जेंव्हा आम्ही आवाज उठवतो तेंव्हा आमच्यावरती जीवघेणे हल्ले होतात. आमच्या मेंढपाळांवर हल्ले होतात. वंचित समूहावर अँट्रोसिटीच्या घटनाही वाढायला लागतात. आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करून आम्हाला दाबले जाते. पण तरीही बाबासाहेबांचे स्मरण करून सगळ्या संकटावर मात करत आपल्याला आपला न्याय हक्काचा संघर्ष सुरूच ठेवावा लागेल. तीच खरी बाबासाहेबांना मानवंदना असेल, असे गोपिचंद पडळकर म्हणाले.


हे सुद्धा वाचा : 

यवतमाळमधील ‘ही’ घटना महाआघाडीच्या पुरोगामीपणाचा बुरखा फाडणारी : गोपिचंद पडळकर

ठाकरे सरकारने धनगरांच्या तोंडावर बोळा फिरवला आहे : गोपीचंद पडळकर

Mumbai: BJP leader Gopichand Padalkar says backward class still suffering in India

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी