28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
HomeनोकरीMPSC मार्फत शिक्षक भरती घेण्याचा शिक्षण आयुक्तालयाने शासनाला दिला प्रस्ताव

MPSC मार्फत शिक्षक भरती घेण्याचा शिक्षण आयुक्तालयाने शासनाला दिला प्रस्ताव

टीम लय भारी

मुंबई : यापुढे राज्यात होणारी शिक्षक भरती ही एमपीएससी(MPSC) परीक्षेमार्फत घेण्यात यावी, याबाबतचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाकडून शासनाला देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात यापुढे शिक्षकांची भरती सुद्धा एमपीएससी परीक्षेमार्फ़त घेण्यात येईल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु याबाबतचा निर्णय होईपर्यंत आहे त्याच पद्धतीने शिक्षक भरती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

एमपीएससी ही राज्य शासनाची सर्वात अनुभवी आणि यशस्वी अशी भरती प्रक्रिया राबविणारी संस्था आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी मार्फत यापुढील शिक्षकांची भरती प्रक्रिया राबविण्यात यावी, असा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाने दिला आहे. या प्रस्तावाबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि शिक्षण सचिव सकारात्मक असून याबद्दलचा निर्णय लवकरच घेण्यात येईल.

दरम्यान, एमपीएससी मार्फत शिक्षकांची भरती करण्यासाठी तांत्रिक बदल आणि नियमांमध्ये बदल करण्याची गरज असल्याने यासाठी वेळ देण्याची गरज आहे. तसेच तोपर्यंत आहे त्याच पद्धतीने शिक्षक पदांची भरती पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्याकडून देण्यात आली आहे. सध्या राज्यात पवित्र संकेतस्थळाच्या मार्फत शिक्षकांची भरती करण्यात येत आहे. पण यामध्ये सुद्धा अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने शिक्षक भरती करण्यास विलंब होत आहे.

हे सुद्धा वाचा :

राज्य सरकारकडून मेगा भरती; दीड हजार लिपिकांची पदे भरणार

महाराष्ट्रातील तरुणांना शासकीय सेवेत दाखल होण्याची सुवर्णसंधी !

सोनिया गांधी ईडीच्या शिकार? आज मुंबईसह देशभरात काॅंग्रेसची निदर्शने

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी