32 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमुंबई'एसटी कष्टकरी जनसंघ संघटने'ची स्थापना, गुणरत्न सदावर्तेंची राजकारणात एन्ट्री

‘एसटी कष्टकरी जनसंघ संघटने’ची स्थापना, गुणरत्न सदावर्तेंची राजकारणात एन्ट्री

टीम लय भारी

मुंबई : मागील काही महिन्यांत राज्यभरात झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे चर्चेत असलेले वादग्रस्त वकील गुणरत्न सदावर्ते यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) लवकरच आपल्या संघटनेची घोषणा करणार असून एसटी महामंडळ बँकेच्या निवडणुकीत ते स्वत:चं पॅनेल उभा करणार असल्याची माहिती समोर येत होती. (Gunaratna Sadavarte entry into politics)

याच पाश्वभूमीवर सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी पत्रकार परिषद घेतली.एसटी कष्टकरी जनसंघ नावाने ही संघटना कार्यरत असणार असून एसटीच्या बँकेचं पॅनल ही संघटना लढवणार आहे. माध्यमांशी संवाद साधतातना म्हणाले, संजय राऊत यांना माफी मागण्यास सांगितलं आहे. माफी न मागितल्यास त्यांना कोर्टात खेचणार असल्याचं त्यांनी म्हटलं.

‘डंके की चोट पे’ आम्ही विलीनीकरण करून घेणार आहोत. राम मंदिर व्हावं म्हणून त्या केसमध्ये मी आणि माझी पत्नी वकील होतो. रामजन्म भूमीच्या लढ्यात आम्ही सहभागी होतो. यामुळे संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी सदावर्तेंनी (Gunaratna Sadavarte) केली. नाही तर आम्ही कोर्टात जातो. असा इशारा खासदार संजय राऊतांना दिला.

एसटी महामंडळाची बँक ही सहकाराची बँक असून ती एक स्टेट आहे. ही लोकशाहीच्या माध्यमातून निवडून देण्याची प्रक्रिया आहे, ती कोणाच्या बापाच्या घरची व्यवस्था नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचं नेतृत्व करत राज्य सरकारवर घणाघाती टीका करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं.

‘कष्टकरी आता स्वत:च स्वत:ची माणसे निवडतील. आतापर्यंत राजकीय नेत्यांकडून शेतातील बुजगावण्यांसारखे लोक निवडणुकीत उभे केले जात होते. हे लोक कष्टकऱ्यांचं आर्थिक शोषण करत होते, मात्र आता ही स्थिती बदलणार आहे,’ असं सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा:-

Who is Gunaratna Sadavarte? All you need to know about the advocate arrested in connection with MSRTC strike outside Sharad Pawar’s house

खासदार नवनीत राणा यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी