30 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रॲड. गुणरत्न सदावर्ते यांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

टीम लय भारी 

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानावर हल्लाप्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna sadavarte) सध्या संशयित आरोपी म्हणून मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहेत. Gunratna-sadavarte-got-police-custody

त्यांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदावर्तेंना 11 दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी पोलिसांनी केली होती.

या प्रकरणी ११० आंदोलकांसह एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनाही पोलिसांनी अटक केली. कट रचणे, जमावाला भडकवणे, चिथावणीखोर भाषणे करणे, या गुन्ह्या अंतर्गत वकील गुणरत्न सदावर्तेंना अटक करण्यात आली. यावेळी सरकारी वकील प्रदिप घरात यांनी पोलिसांची बाजू मांडली.

दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने सदावर्ते यांना आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन आंदोलन केलं होतं.

 

हे सुध्दा पहा: 

गुणरत्न सदावर्ते डुप्लिकेट बुद्धिस्ट

Who is Gunaratna Sadavarte? All you need to know about the advocate arrested in connection with MSRTC strike outside Sharad Pawar’s house

घरोघरी फोन करून केला जातोय भाजपचा प्रचार,ऐका एका संतप्त नागरिकाचीप्रतिक्रीया|

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी