32 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमुंबईकिला कोर्टात रंगला, अॅड. सदावर्ते, आंदोलक आणि सरकारी वकीलांचा युक्तीवाद

किला कोर्टात रंगला, अॅड. सदावर्ते, आंदोलक आणि सरकारी वकीलांचा युक्तीवाद

टीम लय भारी 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’ वर शुक्रवारी दुपारच्या सुमारास शेकडो एसटी कर्मचाऱ्यांनी धडक मोर्चा नेला. यावेळी शरद पवारांच्या निवासस्थानाच्या दिशेने चपला देखील भिरकावल्या गेल्या. शरद पवार यांच्या घरावर हल्ला प्रकरणी गावदेवी पोलिसांनी अॅड. गुणरत्न (Gunratna Sadavarte) सदावर्ते यांना काल अटक केली.(Gunratna Sadavarte In Jail)

अॅड. गुणरत्न सदावर्तेंना (Gunratna Sadavarte) न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच्या इतर १०९ आंदोलकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरासमोर आंदोलन केल्याप्रकरणी एकूण ११० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज न्यायालयात तिन्ही बाजूंच्या वतीनं युक्तीवाद करण्यात आला. त्यामध्ये नेमका काय युक्तीवाद करण्यात आला.

सरकारी वकीलांचा युक्तीवाद :-

गुणरत्न सदावर्ते  (Gunratna Sadavarte) यांच्यावर दाखल करण्यात आलेले कलमं गंभीर आह. त्यामुळे त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी. सदावर्तेंनीच कामगारांना शरद पवारांच्या घरावर जायला प्रोत्साहित केलं. आरोपांची संख्या मोठी असल्यानं त्यांची चौकशी कशी करणार? असा सवाल न्यायाधीशांनी केला. त्यावर सरकारी वकील म्हणाले की, सीसीटीव्ही फुटेजेस आहे. आरोपी क्रमांक १ हे सदावर्ते आहेत. या सर्वामागे ते एकटे नसून अजून काही जण त्यांच्यासोबत असणार म्हणून आम्हाला चौकशी करायची आहे.

सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्या भाषणामुळे कामगारांनी हे कृत्य केलंय. पोलिसांवर देखील हल्ला करण्यात आला आहे. दगडफेक आणि चप्पलफेक करण्यात आली आहे. दोन जण जखमी झालेत. रक्ताचे नमूने घेतलेतय. कामगार दारु पिऊन होते अशी शंका आहे. काही जण आपलं नाव खोटं सांगतायत, सोबत पत्ता देखील सांगत नाही आहेत. यासाठी देखील चौकशी करायची आहे. ते खरंच एसटी कामगार आहेत की भाडोत्री होते. हे देखील चेक करायचंय.

हे सुध्दा वाचा :-

Mumbai News Live Updates: Gunaratna Sadavarte sent to police custody till April 11 after attack on Pawar’s residence

यंदा महाराष्ट्र केसरीचा मानकरी कोण ठरणार ?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी