33 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeराजकीयकोल्हापुरात हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसावरुन रामायण ; नेमके काय आहे प्रकरण

कोल्हापुरात हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसावरुन रामायण ; नेमके काय आहे प्रकरण

टीम लय भारी :

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात हल्ली अनेक प्रकरणांवरुन वादंग पेटत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आज शुक्रवारी कोल्हापूरातील कागलमध्ये हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांच्या वाढदिवशी लागलेल्या पोस्टरवरुन नवा वाद सुरु झालाय. त्यामुळे आज भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून कागलचे भाजप नेते समरजित घाटगे यांनी कार्यकर्त्यांसह मोर्चा काढला आहे. यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर तक्रार दाखल करणार असल्याचे समरजित घाटगे यांनी सांगितले. (Hassan Mushrif’s birthday poster controversy)

नेमके काय आहे प्रकरण

कोल्हापूरमध्ये लावण्यात आलेल्या एका बॅनरमध्ये हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांच्या नावासोबत रामाचे नाव जोडण्यात आल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. गेल्या 50 वर्षापासून मी रामनवमीलाच वाढदिवस साजरा करत असून अनेत कार्यकर्ते या दिवशी मला पोस्टर, वर्तमानपत्र अशा अनेक माध्यमातून शुभेच्छा देत असतात.मात्र ज्या बॅनरवरुन इतका वाद सुरु आहे त्या बॅनरबद्दल त्यांना काही माहीतच नसल्याचे मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.10 एप्रिलला राम नवमीदिवशी हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. मात्र, वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या निमित्ताने कोल्हापूर दूध उत्पादक संघाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या पोस्टरवर हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांचे नाव श्रीरामांसोबत जोडले होते. यावरुन भाजप नेते समरजीत घाटगे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांच्यावर तक्रार

प्रकाश तुकाराम बेलवाडे यांनी मुरगूड पोलीस ठाण्यात हसन मुश्रीफ हे वर्षानुवर्षे हिंदूंना फसवित असल्याबद्दल तक्रार केली होती. हसन मुश्रीफ हे गेल्या चार टर्म पासून निवडून येत आहेत.  मुश्रीफ व त्यांचे अनुयायी हे दरवर्षी राम नवमीला ठीक ठिकाणी होर्डींग्स लावतात तसेच अनेक वृतपत्रांमध्ये जाहिराती देतात तसेच सोशल मीडियावर सुद्धा पोस्ट टाकतात या सर्व माध्यमातून रामनवमी ला त्यांचा जन्म झाला आहे असे सर्वांना भासवतात. राजकीय नेता असल्यामुळे हिंदूंच्या कामा प्रति असलेली आस्था ओळखून त्यांची मते मिळवण्यासाठी दर राम नवमीला मोठ्या प्रमाणात त्यांच्या वाढदिवसाची प्रसिद्धी ते करून घेतात व स्वतः सुद्धा करतात. असे तक्रार पत्रकात लिहिलंय.
शासकिय अभिलेखा नुसार  मुश्रीफ यांचा जन्म २४ मार्च १९५४ रोजीचा असून त्या वर्षी खरंच २४ मार्चला राम नवमी होती का हे मी शोधले असता माझ्या असे दाया लक्षात आले की त्यावर्षी 11 एप्रिल, १९५४ रोजी राम नवमी होती. यावरून असे स्पष्ट 7/4/28 की वर्षानुवर्षे मुश्रीफ हे हिंदू मतदारांना त्यांच्याप्रती आकर्षित करण्यासाठी व त्यांचे मत मिळवण्यासाठी खोटे सांगून फसवणूक करीत आहेत.

मी एक हिंदू असून राम भक्त सुद्धा आहे प्रत्येक हिंदू च्या मनात रामाचे स्थान खूप महत्त्वाचे असून प्रत्येक हिंदु रामा प्रती संवेदनशील असतो याचा फायदा घेऊन  मुश्रीफ हे रामनवमी चा जन्म सांगून लोकांना फसवीत आहेत. या वर्षी 10 एप्रिल रोजी राम नवमी असून नेहमीप्रमाणे या वर्षी सुद्धा ते लोकांना फसवण्याची शक्यता आहे आणि लोकांची आता जागृती झाली आहे अश्या वेळी श्री रामाच्या जन्माचा खोटा संदर्भ दिल्याने हिंदू समाजातील नागरिकांच्या भावना दुखावून कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या विषयात लक्ष घालून इथून पुढे हिंदूंची फसवणूक होऊ नये यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी ही मी आपणास या अर्जा द्वारे विनंती करीत आहे.

यावेळी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात १२ एप्रिल २०२२ रोजी मतदान आहे. या निवडणुकीमध्ये मुश्रीफ स्वतः प्रचारक सुद्धा आहेत. कागल विधानसभा आणि कोल्हापूर उत्तर विधानसभा भौगोलिक दृष्ट्या अगदी जवळ असून निवडणूक असलेल्या मतदारसंघात राम नवमीच्या जन्माचा संदर्भ देऊन हिंदूंच्या भावनांशी खेळण्याचा दुर्दैवी कार्यक्रम यंदाही केला जाईल. एक राम भक्त हिंदू आणि सुजाण नागरिक म्हणून मी निवडणूक आयोगाला सुधा यामध्ये योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती करीत,त्यांनी हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे.


हे सुद्धा वाचा :

किरीट सोमय्यांचा ट्विटरवर आणखी एक बॉंम्ब , हसन मुश्रीफांचा मुलगा, जावई आणि इतर 7 जणांविरुद्ध एफआयआर करणार

किरीट सोमय्यांच्या रडारवर हसन मुश्रीफ, 50 दिवसांत ‘डर्टी डझन’ जेलमध्ये जाणार?

हसन मुश्रीफांना भाजपने प्रवेशाची ऑफर न दिल्याचा चंद्रकांत पाटलांचा दावा

 

Hasan Mushrif allegations: Barred from entering Kolhapur on Monday, says BJP leader Kirit Somaiya

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी