30 C
Mumbai
Monday, August 14, 2023
घरआरोग्य६७५ खर्च करून १२२ वर्ष जुन्या ठाणे मेंटल हॉस्पिटलचा होणार मेकओव्हर; १५...

६७५ खर्च करून १२२ वर्ष जुन्या ठाणे मेंटल हॉस्पिटलचा होणार मेकओव्हर; १५ दिवसात निविदा निघणार

ब्रिटिश राजवटीत बांधण्यात आलेले तसेच १२२ वर्ष जुने असलेले १८५० बेडचे सुविधायुक्त ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय (मेंटल हॉस्पिटल) जीर्ण अवस्थेत असून त्यातील काही इमारती धोकादायकही झाल्या आहेत. यासाठी सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाण्यासह कोल्हापूर, रत्नागिरी आदी जिल्ह्यातील मेंटल हॉस्पिटलच्या इमारतींचा पुनर्विकास करण्याचे ठरवत निधीही दिला आहे. त्यानुसार ६७५ खर्च करून ठाणे मेंटल हॉस्पिटलचा मेकओव्हर होणार आहे. १५ दिवसात याची निविदा निघणार असल्याची माहिती मंत्रालयातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. चार महिन्यात निविदा प्रक्रियाचे काम पूर्ण झाल्यावर मेंटल हॉस्पिटलच्या इमारतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. नव्याने होणारे हे हॉस्पिटल आधुनिक सुविधांनी सज्ज होणार असून त्यात ३२७८ बेडची व्यवस्था असणार आहे.

ठाण्यात १९०१ सालापासून मेंटल हॉस्पिटल कार्यरत आहे. ७२ एकरावर हे हॉस्पिटल वसले आहे. यातील तब्बल १४ एकर जागा ही ठाणे महापालिकेला विनामूल्य वर्ग करण्यात आली आहे. त्यापैकी ३.८८ एकर जागा रेल्वेला विनामूल्य वर्ग करण्यात आली आहे. त्या जागेवर कोपरी हे नवं रेल्वे स्थानक बांधलं जाणार आहे. शिवाय हॉस्पिटलच्या जागेवर मोठ्या प्रमाणात बेकायदा नगर वसले आहे. हॉस्पिटलच्या एकूण जागेपैकी १५ एकर जागेवर नव्याने मेंटल हॉस्पिटलची निर्मिती करण्यात येणार आहे. हे काम दोन टप्प्यात बांधण्याचे नियोजन आहे. सध्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये १८५० बेडची व्यवस्था आहे. नव्याने होणाऱ्या मेंटल हॉस्पिटलमध्ये ३२७८ बेडची व्यवस्था असणार आहे. नव्या हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलच्या दोन मजली इमारती, १० मजली नर्सिंग स्टाफ क्वार्टर, १४ मजली स्टाफ क्वार्टर, पुनर्वसन केंद्र तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना तात्पुरते राहण्यासाठी वेगळी इमारत असणार आहे.
हे सुद्धा वाचा
राज्यातील १७ जिल्हे पालक मंत्र्यापासून पारखे; ३६ जिल्ह्यांना अवघे १९ पालकमंत्री
राजद्रोहाचा कायदा रद्द होणार; केंद्राने इंग्रजांच्या काळातले कायदे रद्द केले
सुधीर भाऊ, तुम्ही सुद्धा? … आठ वर्षे झालीत: लॉटरी माफियांसमोर सरकार हतबल

ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या इमारती शंभर वर्षांहून अधिक जुन्या आहेत. त्यामुळे त्या जीर्ण अवस्थेत असून काही धोकादायकही आहेत. या कारणाने या इमारतींचा पुनर्विकास करणे गरजेचे असून शासनाकडे त्यासंदर्भात पुनर्विकासाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. नंतर हॉस्पिटल तयार झाल्यावर रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळण्यास मदत होईल. अशी माहिती ठाणे मेंटल हॉस्पिटलचे अधिक्षक डॉ. नेताजी मुळीक यांनी ‘लय भारी’ शी बोलताना दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी